शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ए.एस. ट्रेडर्सचा एजंट प्रतापसिंह शेवाळे अटकेत, गुन्ह्यातील सोळावा संशयित जेरबंद

By उद्धव गोडसे | Updated: April 1, 2024 15:54 IST

शेवाळे याच्याकडून ४५ लाखांची गुंतवणूक

कोल्हापूर : गुंतवणूकदारांची फसवणूक करणा-या ए.एस. ट्रेडर्स कंपनीचा एजंट प्रतापसिंह विनायक शेवाळे (वय ५०, रा. बाबू पार्क, बहिरेवाडी, ता. पन्हाळा) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने बहिरेवाडी येथील घरातून सोमवारी (दि. १) अटक केली. या गुन्ह्यात अटक केलेला हा सोळावा संशयित आहे. न्यायालयात हजर केले असता, त्याची पोलिस कोठडीत रवानगी झाली.कमी कालावधीत मोठा परतावा देण्याचा आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणा-या ए.एस. ट्रेडर्स कंपनीचे संचालक आणि एजंट अशा २८ जणांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने या गुन्ह्यातील सोळावा संशयित जेरबंद केला. गुन्हा दाखल झाल्यापासून एजंट प्रतापसिंह शेवाळे हा पसार होता.सध्या तो त्याच्या बहिरेवाडी येथील घरात असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जाऊन त्याला अटक केली. त्याने ए.एस. ट्रेडर्स कंपनीत एजंट म्हणून दोन वर्ष काम केले. या कालावधीत ३० गुंतवणूकदारांचे सुमारे ४५ लाख रुपये त्याने कंपनीत विविध योजनांमध्ये जमा केले. यातील काही गुंतवणूकदारांना परतावे मिळाले आहेत. २०१९ मध्ये काम बंद केल्यानंतर काही गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेतले, अशी माहिती शेवाळे याने पोलिसांना दिली.

नोकरी गेल्यानंतर बनला एजंटअटकेतील संशयित शेवाळे हा मनुग्राफ कंपनीत काम करीत होता. नोकरी गेल्यानंतर तो ए.एस. ट्रेडर्समध्ये एजंट म्हणून काम करू लागला. कंपनीचा संचालक बाळासो कृष्णात धनगर याच्या सांगण्यावरून त्याने कमिशन एजंट म्हणून काम सुरू केले. याचे काही मित्र आणि नातेवाईकही ए.एस.च्या जाळ्यात अडकले आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस