चंदगड : येथील नगरपंचायतीसाठी नगराध्यक्षपद खुले झाल्याने अनेक मातब्बर नेत्यांनी तयारी सुरू केली आहे. त्यामुळे चुरशीचा सामना होणार आहे.गेल्या वेळी चंदगड शहर विकास आघाडीने अनेक गटांना सोबत घेत राष्ट्रवादी काँग्रेसकडे नगराध्यक्षपद मिळविले होते. गेल्या वेळीचा वचपा काढण्यासाठी भाजपकडूनही यावेळी आधीच व्यूहरचना करण्यात आली असून त्याला भेदण्यासाठी चंदगड शहर विकास आघाडी कोणती रणनीती आखणार यावर निकाल ठरणार आहे. तसेच अनेक कार्यकर्ते वैयक्तिकही तयार करत आहेत. त्यामुळे कोणत्याही पक्षाला किंवा गटालाही निवडणूक सोपी नसल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. भाजपकडून माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ, चंदगड अर्बन बँकेचे संचालक सुनील काणेकर, सुरेश सातवणेकर, माजी नगरसेवक विजय कडूकर, चंदगड शहर विकास आघाडीकडून दयानंद काणेकर, माजी उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला यासह अनेक जण इच्छुक आहेत.
Web Summary : Chandgad's Nagaradhyaksha post is open, igniting a fierce contest. Multiple leaders are preparing, with BJP and Chandgad Shahar Vikas Aghadi strategizing. Individual candidates also add complexity, making victory challenging for all involved in this Nagarpanchayat election.
Web Summary : चंदगढ़ में नगराध्यक्ष का पद खुलने से कड़ी टक्कर होने की संभावना है। भाजपा और चंदगढ़ शहर विकास अघाड़ी रणनीतियां बना रहे हैं। व्यक्तिगत उम्मीदवार भी मैदान में हैं, जिससे नगर पंचायत चुनाव में जीतना सबके लिए मुश्किल हो गया है।