शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

फाँड्री उद्योग अडचणीत, कच्च्या मालाचे दर गगनाला भिडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 18:21 IST

फाँड्रीला लागणारे पिग आयर्न, स्कॅप, कोळशाचे दर गगनाला भिडले

सतीश पाटीलशिरोली : फाँड्रीला लागणारे पिग आयर्न, स्कॅप, कोळशाचे दर गगनाला भिडले असून,एक वर्षात दुप्पट दरवाढ झाली आहे. या दरवाढीमुळे फाँड्री उद्योग अडचणीत आला आहे. पिग आयर्न प्रति टन ६० हजार च्या घरात पोहचले आहे,एस जे स्क्रॅप ४४ हजार,  कोळसा ५४ हजार,स्टील ४२हजार इतकी मोठी वाढ झाली असुन फेब्रुवारी महिन्यात आणखी प्रति टन दोन ते तीन हजार रुपये वाढ होणार असल्याचे ट्रेडर्स आणि उद्योजकांनी सांगितले आहे.गेल्या वर्षी जानेवारी २०२१ मध्ये  पिग आयर्न ३८ ते ४० हजार, स्क्रॅप ३८ ते ४० हजार, कोळसा ३२ हजारांवर दर होते. एक वर्षात दर जवळपास दुप्पटीच्या घरात गेले आहेत.त्यामुळे फौड्री उद्योग अडचणीत आले आहेत.ऑटोमोबाईल क्षेत्रावर सध्या मंदीचे सावट आहेत मागणी ही ३० ते ४० टक्क्यांनी घटली आहे.असे असताना ही प्रत्येक महिन्याला पिग आयर्न, स्कॅप, कोळशाचे दर वाढत आहेत. उद्योजकांच्या मते ही मार्केट पाॅलीसी आहे या कोणताही आधार नाही.उद्योजकांना लुबाडणूक करण्याचे काम सुरू आहे.प्रामुख्याने पिग आयर्न, स्क्रॅप कोळसा,स्टील, सिलिका सॅन्ड, फेरो सिलिकॉन, फेरी मँगेनीज,सह,आदी कच्चा माल लागतो.तो बहुतांश विदेशातून आयात होते; आयात शुल्क वाढला आहे,आयात होताना अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत,पोर्ट चार्जेस वाढले आहेत.चार महिन्यांपासून मागणी कमीकोल्हापूरच्या फाँड्री उद्योगाला हजार टन पिग आयर्न,२० हजार स्क्रॅप  लागतो. पण गेल्या चार महिन्यांपासून प्रतिटन चार हजार ने मागणी कमी झाली असून सुद्धा दर वाढतच आहेत. सध्या पिश आयर्न सेसा गोवा आणि कर्नाटक होस्पेट येथून येते, तर कोळसा गुजरातमधून येतो.स्कॅपचा पुणे, मुंबई, बंगलोरवरून पुरवठा होतो.सिलिका सॅन्ड फोंडा (कणकवली),कर्नाटकातून येते. जिल्ह्यात फाँड्रीत कास्टिंग तयार करण्यासाठी महिन्याला २० हजार टन पिग आयर्न, २० हजार टन स्क्रॅप, १५०० टन कोळसा, शंभरहून अधिक ट्रक सिलिका सँड लागते. तेव्हा महिन्याला ४० ते ५० हजार टन कास्टिंग तयार होते.सँडमध्ये कोणतीही दरवाढ नाहीफौंड्री उद्योगाला सँड मोठ्या प्रमाणात लागते ती कोकण आणि कर्नाटक येथून येते सध्या अडीच ते तीन रुपये प्रति किलो दर आहे. कोणतीही दरवाढ झालेली नाही.

गेल्या वर्षभरात कच्च्या मालाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. पिग आयर्न ५९ हजार रुपये झाले आहे.स्क्रॅप ४४ हजार,कोळसा ५२ हजार वर पोहचला आहे.या महिन्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. -एम बी शेख-उद्योजक

 

कच्या मालाची होणारी सतत दरवाढ यामुळे फौंड्री उद्योग चालवायचा कसा हा मोठा प्रश्न आहे. अगोदर मंदी आली आहे.आणि त्यात दरवाढ त्यामुळे उद्योजक अडचणीत आले आहेत. - निरज झंवर, फौंड्री उद्योजक 

 

फौंड्रीला सॅन्ड ही लागतेच सध्या सॅन्डचे दर वाढलेले नाहीत पण पेट्रोल डिझेल चे दर वाढल्याने मायनींगला ही जादा खर्च होतो त्यामुळे भविष्यात दरवाढ होण्याची शक्यता आहे. -शेखर कुसाळे, उद्योजक

टॅग्स :kolhapurकोल्हापूर