शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

बाळूमामा देवस्थानचा भ्रष्टाचार वेशीवर टांगला, ‘धर्मादाय’ला का बरं झोंबला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 12:13 IST

दबाव टाकण्याचा प्रयत्न

कोल्हापूर : श्री बाळूमामा देवालय ट्रस्ट, आदमापूर (ता. भुदरगड) येथील भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस येत असताना धर्मादाय उपायुक्त कार्यालयाला मात्र चांगल्याच मिरच्या झोंबल्या आहेत! गेल्या दोन दिवसांपासून न्यायालयातील खटल्याचे कारण सांगून, कोणाच्या परवानगीने बातम्या प्रसिद्ध करत आहात? अशा स्वरूपाचा दबाव आणला जात आहे.ज्या ट्रस्टशी संबंधित हे प्रकरण आहे, त्याचे विद्यमान व माजी पदाधिकारी जे प्रसिद्ध होत आहे, त्याबद्दल चकार शब्द काढायला तयार नाहीत आणि धर्मादाय उपायुक्त कार्यालय मात्र वारंवार आक्षेप घेत आहे. मग त्यांना हा भ्रष्टाचार सुरू राहावा किंवा त्यावर पांघरूण घालावे, असे का वाटत आहे, हेच खरे गौडबंगाल आहे ! या ट्रस्टचा कारभार एवढा स्वच्छच आहे, तर मग धर्मादाय कार्यालयानेच त्यावर प्रशासक का नेमला आहे, याचे स्पष्टीकरण त्यांनीच देण्याची गरज आहे.

सर्वसामान्य भक्तांची श्रद्धा ज्यांच्या चरणांशी येऊन थांबते, त्या श्री बाळूमामा देवालयात गेल्या २० वर्षांत झालेल्या भ्रष्टाचारावर आधारित मालिका ‘लोकमत’मध्ये सोमवार (दि. ३०) पासून सुरू झाली आहे. ती सुरू झाल्यावर धर्मादाय उपायुक्त कार्यालयाकडून चौकशीला येण्यासाठी सांगण्यात आले. या प्रकरणी उच्च न्यायालयात प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने अशा बातम्या प्रसिद्ध करणे हा न्यायालयाचा अवमान ठरू शकतो, याची त्यांनी लेखी पत्राद्वारे आठवण करून दिली.न्यायालयात खटला दाखल असतानाही पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कारभाराबद्दल अशा बातम्या माध्यमांतून प्रसिद्ध झाल्या आहेत आणि न्यायालयात खटला सुरू असताना त्यासंबंधीच्या बातम्या देऊ नयेत, असा कायदा नाही. मंगळवारी कार्यालयातील कुणीतरी निरीक्षक असलेल्या रागिणी खडके यांनी ‘तुम्ही कागदपत्रे कोणाकडून घेतली, कोणाच्या परवानगीने बातम्या छापता?’ अशा उद्धट भाषेत संवाद साधला.

तक्रारीनंतरच कारवाईबाळूमामा देवालयातील भ्रष्टाचारविरोधात ‘धर्मादाय’कडे तक्रारी झाल्यानंतर निरीक्षक, अधीक्षकांनी चौकशी अहवाल सादर केले. सहायक धर्मादाय आयुक्त वर्ग १ यांनी या सगळ्या प्रकरणांवर ताशेरे ओढत, स्वत:हून ४१ ड अंतर्गत स्वयंखुद्द कारवाई प्रस्तावित केली. त्यानंतर धर्मादाय सहआयुक्तांनी ट्रस्टच्या बरखास्तीचा निर्णय दिला. ही सगळी कारवाई धर्मादाय कार्यालयांतर्गतच झाली आहे.

नाईकवाडेंना थांबवले... खडकेंना पाठवले‘बाळूमामांच्या खजिन्यावर डल्ला’ या वृत्तमालिकेचा सोमवारी ‘लोकमत’मध्ये पहिला भाग प्रसिद्ध होताच देवालयाचे प्रशासक शिवराज नाईकवाडे यांना आदमापूरला जाण्यास मज्जाव करण्यात आला. त्यांना कार्यालयातच थांबण्यास सांगण्यात आल्याचे समजते. ‘लोकमत’ला माहिती कशी मिळाली, याचा छडा लावण्यासाठी खडके यांना आदमापूरला पाठवले.

रुपयालाही घामाचा वास..बाळूमामांचे सारे भक्त अत्यंत कष्टकरी समाजातील आहेत. तिथे येणारा कोणीही भक्त धनदांडगा नाही. त्याने घामाच्या स्वकमाईतील रक्कम बाळूमामांच्या चरणी श्रद्धेने वाहिली आहे. त्यातूनच या देवालयाचा कारभार चालतो. त्यावर देवाचे नाव घेत कोणी डल्ला मारणार असेल तर ते संतापजनकच आहे. तिथे गैरकारभार सुरू आहे अशी चर्चा होती; परंतु नेमके काही समजत नव्हते. ‘लोकमत’ने त्याचा पर्दाफाश केला, ते चांगलेच झाले, अशाच प्रतिक्रिया गेल्या दोन दिवसांपासून ‘लोकमत’कडे येत आहेत. गैरव्यवहारांबद्दलची माहितीही ‘लोकमत’कडे येत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBalumamachya Navane Changbhaleबाळूमामाच्या नावानं चांगभलं