शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीची तयारी सुरू; कोल्हापूर हद्दवाढीचा विषय बारगळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 12:21 IST

कोल्हापूर : गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूर शहराची हद्दवाढ व्हावी, अशी आग्रही मागणी होत असताना आणि याबाबत सरकार सकारात्मक विचारात ...

कोल्हापूर : गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूर शहराची हद्दवाढ व्हावी, अशी आग्रही मागणी होत असताना आणि याबाबत सरकार सकारात्मक विचारात असतानाच राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने महानगरपालिकेची चार सदस्यीय प्रभागरचना करण्याचे निर्देश मंगळवारी दिल्यामुळे ऐन टप्प्यावर कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा विषय पुन्हा एकदा बारगळला. हद्दवाढ होणे आता अशक्य आहे.कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा विषय सध्या जोरदार चर्चेत होता. स्थानिक पातळीवर होत असलेला आग्रह, खासदार शाहू छत्रपती यांनी यात लक्ष घालून पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांची बैठक घेऊन त्यांची भूमिका विचारली होती. त्यावेळी सर्वांनी हद्दवाढीचे समर्थन केले होते. त्यामुळे या विषयाला थोडी गती मिळाली होती.हद्दवाढीबाबत सर्वांना विश्वासात घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनीही मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते; परंतु यातील कोणतीही गोष्ट साध्य झाली नाही.सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला दिले. त्यानुसार आयोगाने नगरविकास विभागाला पत्र पाठवून प्रभाग रचना तयार करण्याची सूचना दिली होती. यावर आज, नगरविकास विभागाने अ, ब, क, व ड महानगरपालिकांची प्रभागरचना तयार करण्याचा अध्यादेश काढला. त्यामुळे शहराच्या हद्दवाढीवर आता पडदा पडला आहे. हद्दवाढीचा विषय आणखी काही वर्षे रखडणार, हे स्पष्ट झाले.