शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोटातील कारचा मालक सलमान पोलिसांच्या ताब्यात; गाडी दुसऱ्याला विकल्याचा दावा! पोलिसांची चौकशी सुरू
2
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
3
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
4
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
5
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
6
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
7
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
8
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
9
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
10
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
11
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
12
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
13
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
14
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
15
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
16
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
17
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
18
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
19
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
20
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल

महिला, मुलींसह प्रौढांनी घर सोडून जाण्याचे प्रमाण वाढले; कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल २३८४ जण बेपत्ता

By उद्धव गोडसे | Updated: November 10, 2025 20:06 IST

किती जणांचा लागला शोध.. जाणून घ्या

उद्धव गोडसेकोल्हापूर : विविध कारणांनी महिला, मुलींसह प्रौढांनी घर सोडून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या १० महिन्यांत जिल्ह्यात तब्बल २३८४ जण बेपत्ता झाल्याच्या नोंदी पोलिस ठाण्यांमध्ये झाल्या. यातील १८४२ जणांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले, तर अजूनही ५४२ जणांचा शोध सुरूच आहे. विशेष म्हणजे यात १७ अल्पवयीन मुली आणि २८६ महिलांचाही समावेश आहे.कौटुंबिक वाद, नैराश्य, अपयश, बेरोजगारी, लग्नाचे आमिष अशा अनेक कारणांनी शेकडो लोक घर सोडून निघून जात आहेत. काही ठराविक वेळेत ते परत न आल्यास नातेवाइकांकडून पोलिस ठाण्यात बेपत्ता वर्दी दिली जाते. त्यानुसार जिल्ह्यात गेल्या १० महिन्यांत तब्बल २३८४ जण बेपत्ता झाल्याच्या नोंदी आहेत. यात १४१९ महिला, ७१३ पुरुष, २०९ अल्पवयीन मुली आणि ४३ अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. यातील ११३३ महिला, ४७६ पुरुष, १९२ अल्पवयीन मुली आणि ४१ अल्पवयीन मुलांचा शोध घेऊन पोलिसांनी त्यांच्या घरी सोडले.कौटुंबिक वादातील रागाच्या भरात निघून गेलेले काही लोक स्वत:हून परत येतात. लग्न आणि प्रेमाच्या आमिषाने घर सोडून पळालेल्या अल्पवयीन मुलींना काही दिवसांतच जगण्यातील वस्तुस्थितीचे चटके लक्षात येतात. अशा काही मुली दोन-तीन महिन्यांत घरी परततात. १८ वर्षांवरील तरुणी प्रियकरासोबत लग्न करून थेट पोलिस ठाण्यातच हजर होतात. त्यामुळे त्यांचा तपास थांबतो. तरीही २८६ महिला, २३७ पुरुष, १७ अल्पवयीन मुली आणि दोन मुलांचा शोध सुरूच आहे.

तर अपहरणाचा गुन्हाअल्पवयीन मुले बेपत्ता झाल्यास अपहरणाचा गुन्हा नोंद केला जातो. पोलिसांसह अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक विभागाकडून त्यांचा शोध घेतला जातो. मुले बेपत्ता होण्याची प्रकरणे पोलिसांकडून गांभीर्याने घेतली जातात, त्यामुळे त्यांचा शोध लागण्याचे प्रमाण जास्त असते.५४२ जणांचा शोध सुरूचजिल्ह्यातील २३८४ बेपत्ता व्यक्तींपैकी १८४२ जणांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. मात्र, अजूनही ५४२ व्यक्तींचा शोध सुरू आहे. यात २८६ महिला आणि १७ अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. यातील काही मुली आणि महिला परराज्यात गेल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

दहा महिन्यांतील बेपत्ताव्यक्ती - बेपत्ता - मिळाले - शोध सुरू

  • महिला - १४१९ - ११३३ - २८६
  • पुरुष - ७१३ - ४७६ - २३७
  • अल्पवयीन मुली - २०९ - १९२ - १७
  • अल्पवयीन मुले - ४३ - ४१ - ०२

बेपत्ता अल्पवयीन मुले आणि मुलींचा शोध घेण्यात कोल्हापूर जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. महिला आणि पुरुषांचा शोध घेण्याचे काम सातत्याने सुरू असते. कौटुंबिक वादांमुळे काही जण परराज्यात जाऊन ओळख लपवून राहत असल्याने तपासात अडचणी येतात. - रवींद्र कळमकर - पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा

English
हिंदी सारांश
Web Title : Missing Persons Surge in Kolhapur: Adults, Women, and Girls Vanish

Web Summary : Kolhapur faces rising disappearances. Over 2384 people, including 286 women and 17 minor girls, went missing in 10 months. Police found 1842, but 542 remain untraced due to family issues, love affairs, and economic factors.