शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
3
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
4
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
5
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
6
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
7
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
8
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
9
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
10
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
11
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
12
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
13
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
14
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
15
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
16
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
17
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
18
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
19
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
20
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा

कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल २० हजार नवमतदारांची नोंद, तृतीयपंथीयांचाही प्रतिसाद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 16:21 IST

अंतिम यादी २२ ला होणार प्रसिद्ध

कोल्हापूर : निवडणूक आयोगाने राबविलेल्या मतदार पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत व विशेष अभियानामुळे जिल्ह्यात १८ ते १९ वयोगटातील २० हजार ९६१ मतदारांची नोंद झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक विभागातर्फे मतदार यादी अंतिम करण्याचे काम सुरू असून, २२ जानेवारीला अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. या यादीत नाव असलेल्या नागरिकांनाच लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येईल.यंदाचे वर्ष निवडणुकांचे असल्याने लोकसभा-विधानसभा निवडणुकीचे पडघम आताच वाजू लागले आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगानेही गेल्या वर्षभरापासून अचूक मतदार यादी तयार करण्यावर भर दिला आहे. त्याअंतर्गत सुरू असलेल्या मतदार पुनरिक्षण उपक्रमांतर्गत दुबार, छायाचित्र एकसमान, दोन मतदारसंघांत नाव असलेले, मयत अशा व्यक्तींची नावे वगळली जात आहेत. निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार लोकसभेसाठीची अंतिम मतदार यादी ५ जानेवारीला प्रसिद्ध होणार होती. मात्र, त्याला आता मुदतवाढ मिळाली असून, २२ जानेवारीला ही यादी प्रसिद्ध होईल.

जिल्ह्यातील एकूण मतदार

  • पुरुष : १६ लाख ०४ हजार ३७९
  • स्त्री : १५ लाख ४२ हजार ४४३
  • तृतीयपंथी : १७१

कोणत्या विधानसभा मतदारसंघात किती मतदार?विधानसभा :  पुरुष :  स्त्री :  तृतीयपंथी :  एकूणचंदगड :  १, ५८, ८४३  :  १, ५७, ०३६  :  ११  :  ३, १५, ८९०राधानगरी : १, ७२, ०९४  :  १, ५९, ९७३  :  १४  :  ३, ३२, ०८१कागल : १, ६४, २९० :  १, ६२, १४९ :  ३ :  ३, २६, ४४२कोल्हापूर दक्षिण : १, ७३, ९८४ :  १, ६७, ०७१ :  ४४ :  ३, ४१, ०९९करवीर : १, ६१, ४७५ :  १, ४८, ०३८ :  ० :  ३, ९, ५१३कोल्हापूर उत्तर : १, ४३, ४५९ :  १, ४५, २२९ :  १७ :  २, ८८, ७०५शाहूवाडी : १, ५१, ३३३ :  १, ४१, १६८ : १७ :  ३, २८, ७३७इचलकरंजी : १, ५३, ४४३ :  १, ४५, ५०० : ६१ :  २, ९९, ००४शिरोळ : १, ५६, ९०५ :  १, ५६, ११२ : १ :  ३, १३, ०१८एकूण : १६, ०४, ३७९ : १५, ४२, ४४३ :  १७१ : ३१, ४६, ९९३

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग