शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

तर, आम्ही युद्ध सुरू होण्यापूर्वीच घरी पोहोचलो असतो, कोल्हापूरच्या आर्याने व्यक्त केलं मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 12:02 IST

युद्धामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या कोल्हापूरच्या आर्या नितीन चव्हाण आणि ऋतुजा जलित कांबळे या दोन लेकी रविवारी रात्री उशिरा सुखरूप घरी परतल्या.

कोल्हापूर : युद्धामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या कोल्हापूरच्या आर्या नितीन चव्हाण आणि ऋतुजा जलित कांबळे या दोन लेकी रविवारी रात्री उशिरा सुखरूप त्यांच्या घरी परतल्या. त्यांच्या पालकांच्या जीवाला लागलेला घोर संपला. आर्या आणि ऋतुजा यांना भेटून त्यांची विचारपूस करण्यासाठी सोमवारी दिवसभर त्यांच्या घरी नातेवाईक, मित्रमंडळींची गर्दी झाली.शुक्रवारपेठ धनवडे गल्लीमधील आर्या आणि फुलेवाडीमधील ऋतुजा ही एमबीबीएसच्या शिक्षणासाठी तीन महिन्यांपूर्वी युक्रेनला गेल्या होत्या. गेल्या आठवड्यात गुरुवारपासून युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध सुरू झाले. त्यामुळे आर्या, ऋतुजा यांच्या पालकांना त्या घरी कशा सुखरूप पोहोचणार याचा घोर लागला होता.

भारतीय दूतावासाच्या माध्यमातून युक्रेनमधून रुमानिया आणि तेथून मुंबईमध्ये शनिवारी त्या पोहोचल्या. मुंबईतून रविवारी रात्री उशिरा त्या कोल्हापूरमधील आपल्या घरी सुखरूप पोहोचल्या. कुटुंबातील इतर सदस्यांना पाहून त्यांना अश्रू अनावर झाले.तर, आम्ही युद्ध सुरू होण्यापूर्वीच घरी पोहोचलो असतोरशियाने १४ फेब्रुवारीपासून युद्ध करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यावेळी आमच्या बुकोविनीयन विद्यापीठाने तुम्हाला हवे असेल, तर तुम्ही आपल्या देशात जाऊ शकता असे सांगितले होते. भारतात येण्यासाठीच्या विमानाचे तिकीट दुप्पट झाल्याने अनेक विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी थांबण्याचा निर्णय घेतला. हे दर कमी असते, तर आम्ही युद्ध सुरू होण्यापूर्वीच घरी पोहोचलो असतो. - आर्या चव्हाण

  • आम्ही युक्रेनमध्ये ज्या ठिकाणी राहत होतो. त्या ठिकाणी सुरक्षित होतो. बुकोविनीयन विद्यापीठातील शिक्षक, वरिष्ठ विद्यार्थ्यांनी आम्हा भारतीय विद्यार्थ्यांना मोठी मदत केली. रुमानियाची बॉर्डर सोडण्यासाठी अधिष्ठाता आले होते.
  • युक्रेन, रुमानियातील लोकांनी खूप काळजी घेतली. केंद्र सरकारने पाठविलेल्या विमानातून आम्ही देशात आलो. रशियाने युद्धाचा इशारा दिल्यानंतर लगेचच अमेरिकेने त्यांचे विद्यार्थी नेले. त्याप्रमाणे आपल्या देशाने कार्यवाही केली असती, युद्ध सुरू होण्यापूर्वीच आम्ही सर्व विद्यार्थी तेथून बाहेर पडलो असतो. सुखरूप घरी पोहोचल्याचा आनंद वाटत असल्याचे आर्याने सांगितले
टॅग्स :kolhapurकोल्हापूरRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया