अरुण पाटील समन्वयकपदी
By Admin | Updated: April 9, 2015 00:02 IST2015-04-08T23:44:23+5:302015-04-09T00:02:40+5:30
मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी ही निवड केली.

अरुण पाटील समन्वयकपदी
कोल्हापूर : यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिकच्या राष्ट्रीय सेवायोजना विभागाच्या मानद कार्यक्रम समन्वयकपदी डॉ. अरुण पाटील यांची निवड झाली. मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी ही निवड केली.
२००३ पासून महावीर महाविद्यालयात अभ्यास केंद्र सुरू आहे. डॉ. अरुण पाटील हे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील अभ्यासकेंद्रामधील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्य कोल्हापूर विभागीय कार्यालयातून पाहणार आहेत. त्यांच्या निवडीसाठी महावीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजीराव कणसे, मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रकाश अतकरे, कोल्हापूर विभागाचे संचालक डॉ. भालबा विभूते यांचे सहकार्य लाभले. (प्रतिनिधी)