शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

अरुण पांडव मृत्यू प्रकरणातील आरोपी फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 6:37 PM

कोल्हापूर : शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या कोठडीत अरुण पांडव याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी तत्कालीन पोलीस निरीक्षक सुभाष गंगाधर पन्हाळे (रा. बिबवेवाडी, पुणे) याला उच्च न्यायालयाने सात वर्षांची शिक्षा सुनावली होती. ही शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम केली असून, तेव्हापासून आरोपी पन्हाळे हा फरार आहे.अरुण पांडव (रा. शनिवार पेठ) याचा १९८५ मध्ये शाहूपुरी ...

ठळक मुद्देआरोपी सुभाष पन्हाळेच्या वास्तव्याची माहिती देण्याचे आवाहनसात वर्षांची शिक्षा सुनावली होती

कोल्हापूर : शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या कोठडीत अरुण पांडव याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी तत्कालीन पोलीस निरीक्षक सुभाष गंगाधर पन्हाळे (रा. बिबवेवाडी, पुणे) याला उच्च न्यायालयाने सात वर्षांची शिक्षा सुनावली होती. ही शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम केली असून, तेव्हापासून आरोपी पन्हाळे हा फरार आहे.

अरुण पांडव (रा. शनिवार पेठ) याचा १९८५ मध्ये शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या कोठडीत पोलिसांनी केलेल्या जबर मारहाणीत मृत्यू झाला होता. त्यानुसार तत्कालीन पोलीस निरीक्षक पन्हाळे याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. २००७ मध्ये उच्च न्यायालयाने या गुन्ह्याच्या खटल्यामध्ये पन्हाळे याला सात वर्षांची शिक्षा सुनावली. त्यावर त्याने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या अपिलाचा निकाल २०१३ मध्ये लागला. त्यामध्ये न्यायालयाने त्याची ही शिक्षा कायम केली.

आरोपी पन्हाळे फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्याचा ठावठिकाणा माहीत नसल्याने पोलिसांना शोध घेण्यास अडचणी येत आहेत. त्याच्या वास्तव्याची माहिती कोणाला असल्यास त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा, कोल्हापूर फोन (०२३१) २६६५६१७, तपास अधिकारी, राजेंद्र सानप ८६८९८८१००० यावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी केले आहे.