अरुण भंडारे, महेश कुलकर्णी यांच्यासह पाचजण ‘बेस्ट इंजिनिअर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:28 IST2021-09-14T04:28:41+5:302021-09-14T04:28:41+5:30
या पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे आहे. ‘कोविडचा सामना करण्यासाठी कौशल्य विकास आणि रोजगारासाठी अभियंते’ ही ...

अरुण भंडारे, महेश कुलकर्णी यांच्यासह पाचजण ‘बेस्ट इंजिनिअर’
या पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे आहे. ‘कोविडचा सामना करण्यासाठी कौशल्य विकास आणि रोजगारासाठी अभियंते’ ही संकल्पना घेऊन यावर्षीचा अभियंता दिन साजरा केला जाणार आहे. कोरोना काळात विशेष कामगिरी आणि सामाजिक सेवा केलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यात डॉ. सुधीर सरवदे (राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालय), जयवंत कदम (सीपीआर रक्तसंकलन केंद्र), सुनीता जाधव (सीपीआर रुग्णालय), प्रिया पाटील (विद्यार्थिनी) यांचा समावेश आहे, अशी माहिती कोल्हापूर लोकल सेंटरचे अध्यक्ष महेश चौगुले आणि सचिव प्रदीप कुलकर्णी यांनी पत्रकाद्वारे दिली.
फोटो (१३०९२०२१-कोल-रवींद्र कागलकर (इंजिनिअर), अरुण भंडारे (इंजिनिअर), महेश कुलकर्णी (इंजिनिअर), प्रवीण उके (इंजिनिअर), मंजुनाथ बुर्जी (इंजिनिअर), दिलीप पाटील (इंजिनिअर).