कलाकारांचा महामार्गावर बोंब मारो आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:25 IST2021-03-17T04:25:25+5:302021-03-17T04:25:25+5:30
कोल्हापूर : कलाकारांचे पाेट कलेवरच चालत असते. मात्र, आता पुन्हा एकदा कोरोनाच्या दुसऱ्या संकटाची भीती घालत कार्यक्रमावर बंदी घातली ...

कलाकारांचा महामार्गावर बोंब मारो आंदोलनाचा इशारा
कोल्हापूर : कलाकारांचे पाेट कलेवरच चालत असते. मात्र, आता पुन्हा एकदा कोरोनाच्या दुसऱ्या संकटाची भीती घालत कार्यक्रमावर बंदी घातली जात असल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कार्यक्रमावर बंदी घालू नका, घातलीच तर सरकारी मदतीचे पॅकेज नाही तर राष्ट्रीय महामार्गावर बसून बोंब मारो आंदाेलन करू, असा इशारा कलाकार महासंघाने जिल्हाधिकाऱ्यांना दिला.
निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांची भेट घेऊन व्यथांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. संघाचे अध्यक्ष अनिल मोरे, जिल्हाध्यक्ष जयवंतराव वायदंडे, महेश कदम, उदयराज पोवार, उमेश अवघडे, सोनल डोईफोडे, शोभा पाटील, संग्राम मांडरेकर, अवधून जाधव यांच्यासह कलाकारांनी कार्यक्रमांवर बंदी घालून कलाकारांच्या पोटावर पाय आणू नका, अशी विनंती केली.
गेले वर्षभर लॉकडाऊन व कोरोनामुळे कलाकारांचे जगणे मुश्कील झाले आहे. आता कुठे कार्यक्रम सुरू होत असताना पुन्हा एकदा दुसरी लाट आल्याचे सांगत जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यक्रमांवर बंदी घालण्यास सुरुवात केली आहे. यामुळे कलाकारांचे कुटुंबीय पुन्हा एकदा उघड्यावर येणार आहेत.
फोटो: १६०३२०२१-कोल-कलाकार संघ
फोटो ओळ: कलाकार महासंघाने मंगळवारी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांच्याकडे निवेदन देऊन कलाकारांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.