तरुणाईचा कलाविष्कार आजपासून फुलणार
By Admin | Updated: August 23, 2014 00:08 IST2014-08-22T23:35:03+5:302014-08-23T00:08:14+5:30
सतेज युथ फेस्ट : कपिल शर्मा ठरणार आकर्षण; विविध रंगारंग कार्यक्रम

तरुणाईचा कलाविष्कार आजपासून फुलणार
कोल्हापूर : महाविद्यालयीन तरुणाईचा कलाविष्कार उद्यापासून (शनिवार) येथे फुलणार आहे. तरुणाईच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या सतेज युथ फेस्टची तयारी पूर्ण झाली आहे. महोत्सवात उद्या कॉमेडी नाईटस् विथ कपिल या कार्यक्रमाचे निर्माते व कलाकार कपिल शर्मा यांचे प्रमुख आकर्षण आहे. परंतु त्यांची वेळ निश्चित नाही.
सतेज उर्फ बंटी डी. पाटील फौंडेशनच्यावतीने हा महोत्सव कसबा बावडा रोडवरील ‘ड्रीमवर्ल्ड’ वॉटरपार्कमध्ये होत आहे. उद्घाटन उद्या सकाळी १० वाजता होईल. नव्या पिढीच्या कलागुणांना वाव आणि त्यांच्या सामाजिक जाणीवा समृध्द करण्यासाठी या पहिल्याच फेस्टचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी गृहराज्यमंत्रीसतेज पाटील यांच्या पुढाकाराने कला महोत्सव, गृहिणी महोत्सव, करिअर मेळाव्यास प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. आज दिवसभर त्याचीच अनुभती कार्यक्रमस्थळी आली. या महोत्सवाचे संयोजन ऋतुराज संजय पाटील, प्राचार्य महादेव नरके, उपप्राचार्य रमेश रणदिवे, स्वप्निल हिडदुगी आदींसह अनेकजण करत आहेत. उद्घाटनानंतर ‘कोल्हापूर २०२०’मध्ये कोल्हापूरच्या विकासाबाबत सतेज पाटील, जिल्हा पोलीस प्रमुख मनोजकुमार शर्मा, जिल्हाधिकारी राजाराम माने, महापालिका आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी हे संवाद साधणार आहेत.
शनिवारचे कार्यक्रम : मायमिंग, आर्किटेक्चरल डिझाईन, दुपारी १२ वाजता : स्कीट, लॅन्डस्केप पेंटींग, अॅडव्हेंटर स्पोर्टस्. दुपारी १ वाजता : टग आॅफ वॉर, स्केचिंग या स्पर्धा होतील. दुपारी ३ वाजता : रॉक बँड स्पर्धा. सायंकाळी ६ वाजता : ग्रुप डान्स अॅन्ड कोल्हापूर टॅलेंट हंट. रात्री ८ वाजता : प्रोफेशन रॉक बँड या स्पर्धा, करमणुकीचे कार्यक्रम
रविवारचे कार्यक्रम :
डिबेट, एक्सटेम्पर, वॉर आॅफ डिजेज, फॅशन शो आणि व्यावसायिक नृत्य सादरीकरण होईल. ग्राफीेटी, शॉर्ट फिल्म मेकिंग, फेस पेंटींग, बेस्ट आऊट आॅफ वेस्ट, स्कल्पचींग आणि ट्रेजर हंट या स्पर्धा होतील. रात्री ८ वाजता स्पर्धेचे बक्षिस वितरण होईल.
चार हजारांवर विद्यार्थी..
शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील ५७ महाविद्यालयांतील ४ हजार ९६ स्पर्धक सहभागी.
विविध प्रकारच्या २१ स्पर्धा
५ लाखांहून जास्त रक्कमेची बक्षिसे.
सर्वसाधारण विजेतेपद
अष्टपैलू स्पर्धकास टू व्हिलर गाडीची भेट
प्रवेश कुणाला..
महाविद्यालयाचे ओळखपत्र व प्रवेश
पास आवश्यक