कला, क्रीडाशिक्षक शाळेचा आरसा व कणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:19 IST2021-01-08T05:19:28+5:302021-01-08T05:19:28+5:30

गडहिंग्लज : समाज व राष्ट्र सदृढ, सुसंपन्न घडविण्यासाठी विद्यार्थ्यांचे आरोग्य निरोगी असणे नितांत गरजेचे आहे. शाळेला शिस्त लावण्याचे कार्य ...

Art, sports teacher, school mirror and backbone | कला, क्रीडाशिक्षक शाळेचा आरसा व कणा

कला, क्रीडाशिक्षक शाळेचा आरसा व कणा

गडहिंग्लज : समाज व राष्ट्र सदृढ, सुसंपन्न घडविण्यासाठी विद्यार्थ्यांचे आरोग्य निरोगी असणे नितांत गरजेचे आहे. शाळेला शिस्त लावण्याचे कार्य क्रीडाशिक्षक, तर शाळेला बोलक्या भिंतीतून सजविण्याचे कार्य कलाशिक्षक करतात. परिश्रम व चिकाटी ही यशाची गुरुकिल्ली आहे. कलाशिक्षक हा शाळेचा आरसा, तर क्रीडाशिक्षक हा कणा आहे, असे मत ‘कोजिमाशि’चे दादासाहेब लाड यांनी केले.

येथील ‘कोजिमाशि’ पतसंस्थेच्या सभागृहात कला व क्रीडाशिक्षकांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी रफिक पटेल, विनायक नाईक, अनिल पाटील, संपत सावंत, राजाराम माने, मदन दंडगीदास, सचिन वाडकर, बाळासाहेब परितकर, रमण लोहार, बजरंग गरूड, शिवाजी सुतार, सयाजीराव भोसले, एम. डी. सावंत यांचा सत्कार झाला. संजय देसाई, कैलास सुतार, सुभाष पाटील, प्रकाश इंगळे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी मुख्याध्यापक विक्रांत गुरव, आर. के. शिंदे, एकनाथ देसाई, आण्णाराव कापसे, संजय भांदुगरे, पवन सूर्यवंशी, रमेश चौगुले, दत्ता लोहार, सागर सुतार, आदी उपस्थित होते. व्ही. आर. पालेकर यांनी सूत्रसंचालन केले. ना. शि. घोलप यांनी आभार मानले.

----------------------------------------

* फोटो ओळी : गडहिंग्लज येथील कार्यक्रमात दादासाहेब लाड यांनी मार्गदर्शन केले. यावेळी रफिक पटेल, ना. शि. घोलप, विक्रांत गुरव, आदी उपस्थित होते.

क्रमांक : ०६०१२०२१-गड-१०

Web Title: Art, sports teacher, school mirror and backbone