‘लोकमत’ कर्मचाऱ्यांसाठी ‘आर्ट आॅफ लिव्हिंग’
By Admin | Updated: February 24, 2015 00:56 IST2015-02-24T00:53:22+5:302015-02-24T00:56:58+5:30
चांगला उपक्रम : कर्मचाऱ्यांचे आरोग्य व व्यक्तीमत्व विकासासाठी शिबीर; सर्व विभागातील सहकारी सहभागी

‘लोकमत’ कर्मचाऱ्यांसाठी ‘आर्ट आॅफ लिव्हिंग’
कोल्हापूर : कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी व व्यक्तिमत्त्व विकासासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविणाऱ्या ‘लोकमत’तर्फे सोमवारपासून श्री श्री रविशंकर यांच्या ‘आर्ट आॅफ लिव्हिंग’चे शिबिर येथील राम गणेश गडकरी सभागृहात सुरू झाले. त्यामध्ये ‘लोकमत’च्या सर्वच विभागांतील कर्मचारी सहभागी झाले आहेत.वृत्तपत्रांत काम करणाऱ्या लोकांना आरोग्य, व्यायाम याकडे फारसे लक्ष देता येत नाही; परंतु त्यांनी तरी या गोष्टीकडे जास्त लक्ष दिले पाहिजे. कारण त्यांचे दैनंदिन काम तणावपूर्ण असते. यासंबंधीची जागरुकता कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण व्हावी यासाठी हे शिबिर घेण्यात येत आहे. त्याचे ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख व आर्ट आॅफ लिव्हिंगच्या कोल्हापुरातील मुख्य प्रशिक्षिका डॉ. राजश्री भोसले-पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन झाले. ‘लोकमत’चे संस्थापक संपादक स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपवृत्त संपादक चंद्रकांत कित्तुरे, मुख्य बातमीदार विश्वास पाटील, सहाय्यक लेखा व्यवस्थापक अनिल पेटकर, व्यवस्थापक (मनुष्यबळ व प्रशासन) संतोष भोगशेट्टी, व्यवस्थापक (निर्मिती विभाग) आनंद जवळकर, आर्ट आॅफ लिव्हिंगचे स्वयंसेवक अॅड. उदयराज बडस्कर, अविनाश मिरजकर, राजेंद्र क्षीरसागर, संतोष मेहता, राजेश सूर्यवंशी, जगदीश सोमय्या, चैत्राली सरलोभत, अॅड. सुजाता इंगळे, आदी मान्यवर उपस्थित होते.