शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

मागणी वाढली । अन्न आणि औषध प्रशासनाकडून दुकानदारांची चौकशी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 10:54 AM

कोरोनाच्या या कालावधीत ‘आर्सेनिक अल्बम ३०’ औषधाची आयुष मंत्रालयाने शिफारस केली आहे. त्यामुळे या औषधाची मागणी वाढली आहे. तसेच काही सामाजिक संस्था आणि नेते, कार्यकर्ते यांच्याकडूनही या औषधाचे वितरण सुरू आहे.

ठळक मुद्दे‘आर्सेनिक अल्बम’ची चढ्या दराने विक्री

कोल्हापूर : कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी आयुष मंत्रालयाने ह्यआर्सेनिक अल्बम ३०ह्ण या होमिओपॅथी औषधाची शिफारस केली आहे. त्यामुळे या औषधाची मागणी वाढली असून, काही दुकानांमधून अव्वाच्या सव्वा दराने ही औषधे विकली जात आहेत. याची चौकशी अन्न आणि औषध प्रशासनाने सुरू केल्याचे सांगण्यात आले.कोरोनावर अजूनही लस सापडली नसताना त्याला प्रतिबंध करण्यासाठी आयुष मंत्रालयाने वरील औषधाची शिफारस केली आहे. होमिओपॅथीच्या दुकानांमध्ये हे औषध घेण्यासाठी गर्दी होत असून, अनेक ठिकाणी नागरिकांना सरसकट वितरण सुरू असल्याचेही सांगण्यात आले.जिल्ह्यामध्ये एक हजाराहून अधिक डॉक्टर होमिओपॅथीची प्रॅक्टिस करतात. कोल्हापूरमध्ये केवळ होमिओपॅथीच्या औषधांची विक्री करणारी १५ ते २० दुकाने आहेत.कोरोनाच्या या कालावधीत ह्यआर्सेनिक अल्बम ३०ह्ण औषधाची आयुष मंत्रालयाने शिफारस केली आहे. त्यामुळे या औषधाची मागणी वाढली आहे. तसेच काही सामाजिक संस्था आणि नेते, कार्यकर्ते यांच्याकडूनही या औषधाचे वितरण सुरू आहे. परंतु वैद्यकीय सल्ल्याशिवाय अशा पद्धतीने औषध देणे अयोग्य असल्याचेही मत व्यक्त होत आहे. प्रत्येक रुग्णाची प्रकृती तपासून डॉक्टर औषधाची मात्रा ठरवतात व औषध देतात. मात्र अशा पद्धतीने सरसकट औषध वितरण धोकादायक ठरू शकते, असे सांगण्यात आले. 

 

नागरिकांकडून प्रमाणापेक्षा अधिक मागणी वाढल्याने आणि साठा कमी असल्याने अनेक ठिकाणी २० रुपयांचे हे औषध आता ५०, १०० रुपयांनाही विकले जात आहे. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे.आम्ही रुग्णांसाठी नियमितपणे आर्सेनिक अल्बम औषध वापरतो. ताप, सर्दी, खोकल्यासाठी, तसेच सांसर्गिक आजारासाठी हे औषध वापरले जाते. आयुष मंत्रालयाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या औषधाची शिफारस केल्यामुळे मागणी वाढली आहे ही वस्तुस्थिती आहे. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशा पद्धतीचे सरसकट औषध घेणे अयोग्य आहे. - डॉ. हर्षवर्धन जगताप, अध्यक्ष, न्यू इंटिग्रेटेड होमिओपॅथिक असोसिएशन, कोल्हापूर 

टॅग्स :medicinesऔषधंdocterडॉक्टरfraudधोकेबाजी