महाद्वार रोडवर मद्यधुंद अवस्थेत भरधाव मोटार चालविणाऱ्याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:25 IST2021-02-16T04:25:16+5:302021-02-16T04:25:16+5:30

कोल्हापूर : महाद्वार रोड, ताराबाई रोडवर भरधाव मोटार चालवून दोघांना धडक देऊन वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी जुना ...

Arrested for driving under the influence of alcohol on Mahadwar Road | महाद्वार रोडवर मद्यधुंद अवस्थेत भरधाव मोटार चालविणाऱ्याला अटक

महाद्वार रोडवर मद्यधुंद अवस्थेत भरधाव मोटार चालविणाऱ्याला अटक

कोल्हापूर : महाद्वार रोड, ताराबाई रोडवर भरधाव मोटार चालवून दोघांना धडक देऊन वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी मद्यधुंद मोटारचालकास रविवारी मध्यरात्री अटक केली. प्रथमेश रवींद्र निकम (वय २९, रा. जगतापनगर, आयटीआय, पाचगाव, ता. करवीर), असे त्याचे नाव असून, सोमवारी न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, पोलिसांनी त्याला सकाळी तपासासाठी घटनास्थळी फिरविले.

रविवारी सायंकाळच्या सुमारास महाद्वार रोड गर्दीने फुलला असतानाच मद्यधुंद अवस्थेत वेगाने मोटारकार चालवून चार-पाच वाहनांना, तसेच पादचाऱ्यांनाही धडक देऊन जखमी केले. मोटारीला अडविणाऱ्या शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे कृष्णात पोवार यांना मोटारचालक प्रथमेश निकम याने धक्काबुक्की केली होती, नागरिकांनी चालकास बेदम चोप देत मोटारीचे नुकसान केले. त्यानंतर तो मोटारीसह पळून गेला होता. मध्यरात्रीच्या सुमारास त्याला पोलिसांनी त्याच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदवून अटक करून त्याची मोटार जप्त केली.

दरम्यान, त्याला पोलीस कोठडी मिळाल्यानंतर पोलिसांनी तपासासाठी महाद्वार रोड, ताराबाई रोडवर फिरविले. त्यावेळी पोलिसांचा फौजफाटा पाहून नागरिकही गोंधळून गेले.

फोटो नं. १५०२२०२१-कोल-क्राईम०१

ओळ : महाद्वार रोडवर मद्यधुंद अवस्थेत मोटार चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी, तसेच पोलिसाला धक्काबुक्की केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी सोमवारी सकाळी मोटारकार जप्त केली.

Web Title: Arrested for driving under the influence of alcohol on Mahadwar Road