शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
2
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
5
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
6
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
7
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
9
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
10
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
11
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
12
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
13
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
14
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
15
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
16
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
17
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
18
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
19
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
20
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

..अन्यथा ६ मार्चला कोल्हापुरात येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना अडवून जाब विचारू, इंडिया आघाडीचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 13:33 IST

प्रशांत कोरटकरविरोधात कोल्हापुरात निदर्शने, सरकारचा धिक्कार

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या, इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला सरकारचेच अभय आहे. एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे अन् दुसरीकडे त्यांचाच अवमान करणाऱ्यांना सुरक्षा द्यायची हा दुटप्पीपणा महाराष्ट्र सहन करणार नाही. सरकारने कोरटकरला अटक करावी, अन्यथा, येत्या ६ मार्चला कोल्हापुरात येणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडवून याचा जाब विचारू, असा इशारा इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी येथे दिला.कोरटकरविरोधात छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार निदर्शने केली. यावेळी कोरटकर कोण रे, पायतान हाना दोन रे, गुन्हेगाराला संरक्षण देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा दिल्या. खासदार शाहू छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या आंदोलनात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, उद्ववसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, भारती पोवार, हर्षल सुर्वे, सतीशचंद्र कांबळे प्रमुख उपस्थित होते.विजय देवणे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान हा स्वाभिमानी महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ कोरटकरला अटक करावी, अन्यथा दि. ६ मार्चला त्यांना कोल्हापुरात अडवून याचा जाब विचारु.भारती पोवार म्हणाल्या, आमच्या दैवताचा अवमान कोण करत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार हे छत्रपतींचे नाव घेऊन सत्तेवर आले. आता त्यांचा अवमान होत असताना ते का गप्प आहेत..?हर्षल सुर्वे म्हणाले, जातीयवादी कोरटकरला अटक करा. यावेळी सुनीता पाटील, चंद्रकांत यादव, सचिन चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी दुर्वास कदम, दगडू भास्कर, तौफिक मुलानी, ईश्वर परमार, अवधूत साळोखे, सागर यवलुजे, बबन रानगे, भूपाल शेटे, आनंदा माने, रूपेश पाटील व गीता हसूरकर उपस्थित होते.

सरकारने कोरटकरला पाठीशी घालू नये, त्याच्यावर कारवाई करावी. सरकार कारवाई करेल ही अपेक्षा आहे. - शाहू छत्रपती, खासदार, कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजChhatrapati Sambhaji Maharajछत्रपती संभाजी महाराजChief Ministerमुख्यमंत्रीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस