मलकापुरात सेना-राष्ट्रवादी युती अभेद्य राहणार : सत्यजित पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:24 IST2021-09-27T04:24:46+5:302021-09-27T04:24:46+5:30
मलकापूर : आगामी मलकापूर नगर परिषद निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची युती ही अभेद्य राहणार असून, नगर परिषदेवर ...

मलकापुरात सेना-राष्ट्रवादी युती अभेद्य राहणार : सत्यजित पाटील
मलकापूर : आगामी मलकापूर नगर परिषद निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची युती ही अभेद्य राहणार असून, नगर परिषदेवर याच युतीचा विजयाचा झेंडा फडकणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार सत्यजित पाटील यांनी केले.
मलकापूर नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. पाटील म्हणाले, मलकापूर शहरातील नागरिकांनी माझ्या राजकीय प्रवासात भरघोस अशी साथ दिली आहे. विधानसभा निवडणुकीत विरोधकांनी पैशाचा पाऊस पडला तरीदेखील मला शंभर मतांचे मताधिक्य दिले आहे. मानसिंगराव गायकवाड म्हणाले, गेली पंधरा वर्षे आम्ही एकत्र आहोत. राज्यात महाविकास आघाडी येण्यापूर्वीच शाहूवाडी तालुक्यात आम्ही एकत्र आलो आहोत. या वेळच्या निवडणुकीत सर्व तयारीनिशी आम्ही उतरणार असून, विजय आमच्या युतीचा आहे.
यावेळी आघाडी प्रमुख प्रकाश पाटील उपजिल्हा प्रमुख नामदेव गिरी, प्रवीण बेर्डे, राजू भोपळे, तालुका प्रमुख दत्ता पवार, नामदेव गिरी, अनिकेत हिरवे, दस्तगीर अत्तार, किरण घोटणे आदींनी मनोगत व्यक्त केले. या बैठकीस नगरसेवक प्रल्हाद पळसे, सुहास पाटील, सुभाष कोळेकर, गटनेत्या माया पाटील, नगरसेविका संगीता कुंभार, शालन सोनवळे, माजी नगरसेवक विनायक कुंभार, सुभाष पवार आदींसह शिवसेना-राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.