शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाई मंदिराच्या सुरक्षेसाठी सशस्त्र बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 17:31 IST

नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिराच्या सुरक्षेसाठी २४ तास सशस्त्र बंदोबस्त तैनात केला आहे. लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. भाविकांची गर्दी, महिला सुरक्षा, लूटमार, पाकीटमारीच्या घटना घडू नयेत, यासाठी विशेष पथकांद्वारे लक्ष ठेवले आहे. सुमारे २५० पोलीस मंदिराच्या परिसरात पहारा देत आहेत. प्रत्येक भाविकाच्या हालचालीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असणार आहे.

ठळक मुद्दे२४ तास पहारा, २५० पोलिसांचा सहभाग पाकिटमारांवर विशेष लक्ष : वाहतूक पोलीसही सतर्क

कोल्हापूर : नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिराच्या सुरक्षेसाठी २४ तास सशस्त्र बंदोबस्त तैनात केला आहे. लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. भाविकांची गर्दी, महिला सुरक्षा, लूटमार, पाकीटमारीच्या घटना घडू नयेत, यासाठी विशेष पथकांद्वारे लक्ष ठेवले आहे. सुमारे २५० पोलीस मंदिराच्या परिसरात पहारा देत आहेत. प्रत्येक भाविकाच्या हालचालीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असणार आहे.नवरात्रौत्सवाला रविवारपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती. नऊ दिवसांत सुमारे १० लाख भाविक दर्शन घेतील, असा पोलिसांचा अंदाज आहे. त्यानुसार पोलीस आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. सध्या विधानसभा निवडणुकीची धांदल उडाल्यामुळे पोलिसांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढला आहे; परंतु अशा परिस्थितीमध्ये अंबाबाई मंदिराच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष दिले आहे. सकाळी आठ ते रात्री आठ व रात्री आठ ते सकाळी आठ अशा दोन शिफ्टमध्ये २५० पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात केले आहे. जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद जाधव यांनी बंदोबस्ताची आखणी केली आहे.महिला पोलिसांचे विशेष पथकमंदिरात जाण्यासाठी लागलेल्या रांगेत घुसून चोरट्या सराईत महिलांकडून दागिने, पैशाची पाकिटे, मोबाईल अशा वस्तूंची चोरी होण्याची शक्यता गृहीत धरून साध्या वेशातील महिलांचे पोलीस पथक तैनात केले आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथकही मंदिरात नियुक्त केले आहे. मंदिरात प्रवेश करणाºया दरवाजांवर मेटल डिटेक्टर बसविण्यात आले असून आत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक भाविकाची तपासणी करूनच प्रवेश दिला जात आहे. पर्स ठेवण्यासाठी बाहेर व्यवस्था केली आहे.हॉटेल, लॉजची झडतीनवरात्रौत्सवानिमित्त कोल्हापुरात येणारे भाविक लॉज, हॉटेल, यात्री निवास येथे उतरत असतात. या काळात गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक हॉटेलमध्ये थांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांकडून अंबाबाई मंदिराच्या परिसरातील लॉज व यात्री निवासांची दिवसातून एकदा झडती घेतली जात आहे. प्रवेश देताना ओळखपत्रांची पडताळणी करावी, अशा सूचना हॉटेलचालकांना पोलिसांनी दिल्या आहेत.असा आहे बंदोबस्त

  • पोलीस निरीक्षक - २
  • उपनिरीक्षक - १०
  • पोलीस कर्मचारी - १२५
  • होमगार्ड जवान - ५०
  • वाहतूक पोलीस - २५
  • बॉम्बशोधक पथक - १
  • दहशतवादविरोधी पथक- १
  • श्वानपथक- १

 

 

टॅग्स :Mahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस