शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

शिवाजी पेठेत सशस्त्र हल्ला,एक जण गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 11:37 IST

Crimenews, Police, Kolhapurnews शिवाजी पेठेतील महाराष्ट्र हायस्कुल परिसरात शुक्रवारी रात्री दहा वाजता झालेल्या सशस्त्र हल्ल्यात सुभाष पोपटराव देवकर (वय ४५, रा. जरगनगर) हा गंभीर जखमी झाला. सुभाष हा बोलू शकत नसल्यामुळे हल्ला कोणी केला याबाबत नेमकी माहिती रात्री उशिरापर्यंत मिळालेली नाही.

ठळक मुद्देशिवाजी पेठेत सशस्त्र हल्लाएक जण गंभीर जखमी

 कोल्हापूर : शिवाजी पेठेतील महाराष्ट्र हायस्कुल परिसरात शुक्रवारी रात्री दहा वाजता झालेल्या सशस्त्र हल्ल्यात सुभाष पोपटराव देवकर (वय ४५, रा. जरगनगर) हा गंभीर जखमी झाला. सुभाष हा बोलू शकत नसल्यामुळे हल्ला कोणी केला याबाबत नेमकी माहिती रात्री उशिरापर्यंत मिळालेली नाही.सुभाष देवकर हा देवस्थान समितीकडे सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. त्याने सकाळी सहा ते दुपारी दोन अशी ड्युटी केली. रात्री दहा वाजता निवृत्ती चौकाकडून तो फिरंगाई तालीमकडे जात असताना महाराष्ट्र हायस्कुल जवळ अज्ञाताने त्याला गाठले. त्याच्या तोंडावर दोन तिक्ष्ण हत्याराने वार केले. अचानक झालेल्या हल्ल्यात गंभीर झाल्यामुळे सुभाष तेथेच कोसळला. अज्ञाताने तेथून पलायन केले. रस्त्यावरुन जाणाऱ्या काही जणांनी त्याला रिक्षातून सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.जोराचे वार झाल्याने रक्तस्त्राव मोठ्याप्रमाणात झाला असून सुभाष हा बेशुध्द आहे. त्याच्यावर सीपीआर मध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर रात्री साडेअकरा वाजता खासगी रुग्णालयात दाखल करण्यास आले. हा हल्ला कोणी केला, हल्लेखोर एक होता की दोन होते याबाबत पोलिस तपास करत आहेत.

परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आल्यानंतर नेमके काय घडले याचा उलघडा होईल, असे पोलिसांनी सांगितले. देवकर यांच्या मित्रांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस