इचलकरंजी : कबनूर (ता हातकणंगले) येथील मुख्य मार्गावरील मध्यरात्रीच्या सुमारास एका तरुणाचा डोक्यात दगड आणि सिमेंट पाईप घालून निर्घृण खून करण्यात आला. अभिनंदन जयपाल कोल्हापुरे (वय ४४, रा. इंदिरानगर, कबनूर) असे मृताचे नाव आहे. ते खासगी फायनान्स कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करत होते. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पंकज संजय चव्हाण व अन्य अनोळखी तीन ते चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अभिनंदन यांचा भाऊ अभिषेक कोल्हापूरे यांनी फिर्याद दिली आहे. सोमवारी (ता.२७) रात्री अभिनंदन हे कोल्हापुर रोडवरील एका बारमध्ये दारू पिण्यास गेले होते. तेथे वेटरशी किरकोळ वाद झाल्यानंतर ते बारमधून घरी गेले. त्यानंतर थोड्याच वेळात पंकज चव्हाण व अन्य अनोळखी तीन ते चार जण घरी आले. त्यांनी बारमध्ये भांडण झाले आहे, यासंदर्भात आम्ही अभिनंदन यांना पोलीस ठाण्यात घेऊन जाणार असल्याचे त्यांच्या वडिलांना सांगून अभिनंदन यांना सोबत आणलेल्या मोटरसायकलवर बसवून घेऊन गेले. मुख्य मार्गावर असलेल्या पेट्रोल पंपासमोर त्यांच्या डोक्यात दगड आणि सिमेंट पाईपने हल्ला केला. ही घटना मध्यरात्री घडली. बराच वेळ झाला तरी अभिनंदन घरी परत येत नसल्याने नातेवाईकांनी त्यांची शोधा शोध सुरू केली. त्यावेळी भाऊ अभिषेक याला अभिनंदन रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळले त्यांनी ही माहिती घरच्याना आणि पोलिसांना कळवली. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. खुनाचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला आहे. घटनास्थळी रक्ताचे डाग, दगड आणि बिअरच्या बाटल्या आढळून आल्या असून हा खून बारमधील वादातून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
Web Summary : A man was brutally murdered in Kabnur after an argument at a bar. He was taken away from his home by acquaintances and killed with stones and pipes. Police are investigating the crime, suspecting a bar-related dispute.
Web Summary : कबनूर में बार में विवाद के बाद एक व्यक्ति की निर्मम हत्या कर दी गई। परिचित उसे घर से ले गए और पत्थर और पाइप से मार डाला। पुलिस बार से जुड़े विवाद के संदेह में अपराध की जांच कर रही है।