शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात चप्पल स्टँडवरुन राडा, अतिक्रमण विभागाकडून कारवाई 

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: October 10, 2023 12:58 IST

कोल्हापूर : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिराच्या दक्षिण दरवाजाबाहेरील चप्पल स्टँडचे अतिक्रमण महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने मंगळवारी हटवले. यावेळी चप्पल ...

कोल्हापूर : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिराच्या दक्षिण दरवाजाबाहेरील चप्पल स्टँडचे अतिक्रमण महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने मंगळवारी हटवले. यावेळी चप्पल स्टँडधारक कुटुंबातील महिला-पुरुषांच्या विरोधामुळे त्यांच्यात व पोलिसांमध्ये झटापट झाली. कारवाईत अडथळा आणत असलेल्या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मंदिराच्या दारात सुमारे दीड तास हा गोंधळ सुरू होता.अंबाबाई मंदिराच्या दक्षिण दरवाजाबाहेरील दगडी संरक्षक भिंतीला लागून गणेश पाखरे, जीवन पाखरे व प्रकाश कोरवी या एकाच कुटुंबातील चार चप्पल स्टँड येथे होते. पंधरा दिवसांपूर्वी महापालिकेने त्यांना अतिक्रमण हटवण्यास सांगितले होते. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. मंदिराची सुरक्षा व भिंतीचे पुरातन सौंदर्याला बाधा या कारणावरून भिंतीला लागून असलेले चप्पल स्टँड हटविण्याची मागणी गेले काही महिने होत होती. अखेर मंगळवारी सकाळी साडे अकराच्या दरम्यान अतिक्रमण विभागाचे प्रमुख सचिन जाधव यांचे पथक दक्षिण दरवाजाबाहेरील बेकायदेशीर चप्पल स्टँड हटवण्यास आले. पथक येताच कुटुंबाने विरोधाला सुरुवात केली. यात महिलांची संख्या जास्त होती. स्टँडच्या समोर उभे राहून त्यांनी प्रशासनाच्या नावाने शंख केला. काढलेल्या साहित्यावर बसून कारवाईत अडथळा आणत होत्या, मात्र जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिसांनी या महिलांना ताब्यात घेतले. महापालिकेच्या पथकाने जेसीबी, डंपरच्या साह्याने स्टँड हलवून विरोध मोडून काढत कारवाई पूर्ण केली. या तणावपूर्ण वातावरणामुळे परस्थ भाविक काही काळ गोंधळले होते तर बघ्यांचीही मोठी गर्दी होती.

प्रशासनाच्या नावाने बोंबयावेळी महिलांनी प्रशासनाच्या नावाने बोंब मारत व स्वत:चे डोके आपटून घेऊन कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला. सुमारे तासाभराहून अधिक काळ महापालिका अधिकारी, कर्मचारी, पोलिसांसोबत वाद सुरू होता. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर