शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
2
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
3
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
4
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
5
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी निस्तब्ध पडून राहिली नवी नवरी
6
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
7
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
8
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
9
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
10
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
11
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
12
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
13
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
14
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
15
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
16
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
17
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
18
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
19
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
20
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."

योगी आदित्यनाथ यांच्या सभेवरुन आवाडे-हाळवणकर वादाला उकळी; डिजिटल फलकावर फोटो, निमंत्रण नसल्याने वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 13:40 IST

अतुल आंबी इचलकरंजी : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेवेळी लावण्यात आलेल्या डिजिटल फलकांवर सर्व घटक पक्षांच्या प्रमुखांचे ...

अतुल आंबीइचलकरंजी : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेवेळी लावण्यात आलेल्या डिजिटल फलकांवर सर्व घटक पक्षांच्या प्रमुखांचे फोटो असताना त्यामध्ये आमदार प्रकाश आवाडे यांचा फोटो वापरला नाही. तसेच दहा व्हीआयपी पाससह रितसर निमंत्रण मिळाले नसल्याच्या कारणावरून आमदार आवाडे हे सभेला उपस्थित राहिले नाहीत. याबाबत सुरेश हाळवणकर यांनीच डावलले असल्याच्या समजुतीतून आवाडेंनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटील यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. या मानापमान नाट्याची चर्चा मात्र शहरात चांगलीच रंगली आहे.

गत विधानसभा निवडणुकीनंतर आमदार आवाडे यांनी भाजपला पाठिंबा दिल्यापासूनच आवाडे-हाळवणकर यांच्यात वेळोवेळी कलगीतुरा रंगतो. त्यात खासदार धैर्यशील माने गटाचा सुरुवातीपासूनच हाळवणकरांकडेच ओढा आहे. ८ मार्चला झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या महिला मेळाव्यात उभारण्यात आलेल्या भव्य मंचावरील बॅनरवर आवाडे यांचा फोटो नव्हता. त्यामुळे आवाडेंनी बाहेरच्या मुख्य मार्गावर उंचच्या उंच कटआऊट उभारले. त्यामध्ये राहुल आवाडे, प्रकाश आवाडे, मुख्यमंत्री, पंतप्रधान आदींचा समावेश होता. त्यानंतरही अनेकवेळा अशा अंतर्गत कुरघोड्या घडत राहिल्या.यातून आमदार आवाडे यांचे पुत्र राहुल यांनी लोकसभेला शड्डू ठोकला. त्यातूनही पुढे जात आमदार आवाडे यांनी स्वत:चे नाव लोकसभेसाठी जाहीर केले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना त्यांची मनधरणी करावी लागली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दावर आवाडेंनी लोकसभा लढविण्याचे रद्द करून महायुतीचे उमेदवार माने यांना पाठिंबा दिला. त्यानंतर त्यांनी ताराराणी पक्षाच्यावतीने मतदारसंघात मेळावे घेऊन प्रचार सुरू केला.त्यांच्या प्रचार सभांमध्ये उमेदवार माने, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस यांच्यासोबत आवाडे पिता-पुत्रांचे फोटो डिजिटल फलकांवर असतात, तर भाजपच्या प्रचार कार्यक्रमातील बोर्डावर वरील प्रमुखांसह आवाडेंऐवजी हाळवणकरांचे फोटो असतात. या शीतयुद्धातून वाढत गेलेल्या मतभेदाचा बुधवारच्या योगी आदित्यनाथ यांच्या सभेत भडका उडाला. मुख्य फलकावर आवाडे वगळता सर्व घटक पक्षांच्या प्रमुखांचे फोटो वापरले होते.त्याचबरोबर परिसरात लावण्यात आलेल्या लहान-मोठ्या डिजिटल फलक, जाहिराती यावरही आवाडेंचा फोटो नव्हता. तसेच महायुतीतील सर्व पक्षांचे ध्वज सभास्थळी होते. त्यामध्येही ताराराणीचा ध्वज नव्हता. या संपूर्ण प्रकारामुळे आवाडे गट नाराज झाला. प्रमुख कार्यकर्त्यांनी आवाडेंना सभेला जाण्यापासून रोखले. तसेच आवाडेंना अज्ञातस्थळी घेऊन जात त्यांचा फोनही बंद ठेवला.या प्रकारानंतर अनेक प्रमुखांनी रात्री उशिरापर्यंत आमदार आवाडेंना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क झाला नाही. गुरुवारी सकाळीही काही प्रमुखांनी भेटून मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आवाडेंनी नाराजी व्यक्त केली. या संपूर्ण घडामोडीतून धैर्यशील माने यांच्या प्रचारावर नेमका कसा परिणाम होणार, हे लवकरच स्पष्ट होईल.

आवाडेंची प्रचार यंत्रणा थांबलीकार्यक्रमातील मान-अपमान नाट्यानंतर आवाडे गटाने आयोजित केलेले मेळावे, कॉर्नर सभा सध्या तरी स्थगित ठेवण्यात आले आहेत. गटातील पहिल्या फळीतील प्रमुख मोठ्या प्रमाणात नाराज झाले असून, आमदार आवाडे यांच्याकडून सूचना मिळाली तरी ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीत, असे त्यांच्या गोटातून समजले.

सुरक्षिततेच्या कारणामुळे मंचावर मोजकीच उपस्थिती ठेवण्याच्या सूचना होत्या. त्यासाठी महायुतीतील सर्व घटक पक्षांचे प्रमुख, पदाधिकारी आणि बाहेरून आलेले नेते यांच्यासह स्थानिक प्रमुख यांच्या उपस्थितांच्या आकड्यांची जुळवाजुळव करताना नाकीनऊ आले होते. त्यातूनही आवाडे गटाने दहा पास मागितले. मात्र, ते देणे अशक्य असल्याने त्यांना तीन पास दिले गेले होते. त्याचबरोबर प्रमुखांच्या भाषणामध्येही त्यांना वेळ दिली होती. - सुरेश हाळवणकर, माजी आमदार 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Prakash Awadeप्रकाश आवाडेSuresh Ganapati Halvankarसुरेश गणपती हाळवणकरyogi adityanathयोगी आदित्यनाथ