शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

उचंगी धरणावर धरणग्रस्त-पोलिसांमध्ये धुमश्चक्री, बंदी आदेश झुगारत काढला मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 17:25 IST

धरणावरील मशीनरी बंद केल्याशिवाय चर्चा करणार नाही अशी भूमिका कॉ. अशोक जाधव व कॉ. संजय तरडेकर यांनी घेतली. व रखरखत्या उन्हात रस्त्यातच ठाण मांडले. मोर्चातील वातावरण तणावपूर्ण होताच प्रांताधिकारी वसुंधरा बारवे मोर्चाच्या ठिकाणी दाखल झाल्या.

आजरा : उचंगी  ता.आजरा येथील धरणग्रस्तांनी आपल्या मागण्यांसाठी बंदी आदेश झुगारत धरणाच्या घळभरणीचे काम बंद करण्यासाठी मोर्चा काढला. पोलिसांनी रस्त्यातच मोर्चा अडविल्यानंतर धरणग्रस्त व पोलिसांमध्ये धुमश्चक्री झाली. प्रांताधिकारी वसुंधरा बारवे, पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता विजयसिंह राठोड, तहसीलदार विकास अहिर यांनी उजव्या तीरावरील रस्ता, गायरान जमिनीचे सपाटीकरण व शिल्लक जमिनीच्या मोजणी बाबत लेखी पत्र दिल्यानंतर मोर्चा थांबवण्यात आला.धरणग्रस्तांनी घळभरणीचे काम बंद करण्यासाठी धरण स्थळावर मोर्चा काढला. पाटबंधारेचे अधिकारी विजयसिंह राठोड यांची बदली झालीच पाहिजे, दादागिरी नही चलेगी, आधी पुनर्वसन मगच धरण अशा घोषणा दिल्या. मोर्चा वाटेतच अडविल्यानंतर धरणग्रस्त पोलिसांचे कडे तोडून मशीनरी बंद करण्यासाठी निघाले होते. यावेळी धरणग्रस्त व पोलिसांमध्ये जोरदार धुमचक्री झाली. पोलिसांनी काही धरणग्रस्तांना ताब्यातही घेतले. मात्र, धरणग्रस्त आक्रमक होताच त्यांना सोडून देण्यात आले.धरणग्रस्तांची धरपकड करणाऱ्या अधिकाऱ्यांना महिलांनी शिव्यांची लाखोली वाहत थेट जाब विचारला. धरणावरील मशीनरी बंद केल्याशिवाय चर्चा करणार नाही अशी भूमिका कॉ. अशोक जाधव व कॉ. संजय तरडेकर यांनी घेतली. व रखरखत्या उन्हात रस्त्यातच ठाण मांडले. वातावरण तणावपूर्ण होताच प्रांताधिकारी वसुंधरा बारवे घटनास्थळी दाखल झाल्या.प्रांताधिकारी बारवे  यांनी ११० लोकांच्या १५० घरांसाठी ३ कोटी १८ लाख मंजूर झाले आहेत. त्याचे वाटपही सुरू झाले आहे असे सांगून धरणग्रस्तांना यादी दिली. उजव्या तीरावरील रस्त्याचे काम दोन मेपासून सुरू केले जाईल. गायरान जमिनीचे सपाटीकरण सुरूच आहे ते जूनअखेर पूर्ण केले जाईल. शिल्लक जमिनीच्या मोजणीबाबत भूमी अभिलेख कार्यालयात पैसे भरून तातडीने मोजणी करण्याचे लेखी आश्वासन उपविभागीय अभियंता विजयसिंह राठोड यांनी दिल्यानंतर आंदोलन थांबवले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर