शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणाबाबत आक्षेपार्ह वक्तव्यावरून जिल्हाधिकारी-मराठा समाजात वाद

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: August 23, 2023 13:00 IST

अवमान खपवून घेणार नसल्याचा कार्यकर्त्यांचा इशारा : जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळला आरोप

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाचे शांततेने आंदोलन असताना त्याविरोधात झारीतील शुक्राचार्य काम करत आहेत. जबाबदार अधिकारीही चुकीचे वक्तव्ये करून ओबीसी व मराठा समाजामध्ये तेढ निर्माण करत आहेत. मराठ्यांचा अवमान खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना दिला. कपोल्पित गोष्टींवर विश्वास ठेऊ नका, मी असे कोणतेही वक्तव्य केलेले नसल्याचे स्पष्ट केले. जिल्हाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावादी झाली.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत १५ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत एका अधिकाऱ्याने आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची पोस्ट व्हायरल झाली होती. त्याबाबत जाब विचारण्यासाठी सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते.संजय पवार यांनी मराठा आरक्षणासाठी समन्वयाने प्रयत्न सुरू असताना आपण आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे समजले असून, ही बाब घातक असल्याचे सांगितलेे. यावर जिल्हाधिकारी म्हणाले, आधी असे झाले आहे का हे तपासून बघूया, मग पुढील चर्चा करूया.उपमुख्यमंत्र्यांसोबत झालेली बैठक गोपनीय होती. त्यात काय चर्चा झाली हे मी सांगू शकत नाही. ज्या व्यक्तीने बैठकीत घडलेले बाहेर सांगितले तेदेखील प्रोटोकॉलचा भंग आहे. मी असे कोणतेही वक्तव्य केलेले नाही. मी बोललेले चुकीच्या पद्धतीने तुमच्यासमोर आले आहे.ॲड. बाबा इंदुलकर म्हणाले, आपल्या उत्तराने आमचे समाधान झालेले नाही. खोटे आरोप होत असतील तर त्याचा खुलासा प्रशासनाने का दिला नाही, या प्रकरणाची चौकशी का केली नाही? ही चर्चा सुरू असताना बाबा इंदुलकर यांचा आवाज वाढल्याने त्यांच्यात व जिल्हाधिकाऱ्यांमध्ये शाब्दीक खडाजंगी झाली. दिलीप देसाई यांनी या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी केली.विजय देवणे म्हणाले, उपमुख्यमंत्र्यांनी वेगवेगळी बैठक घेऊन गोपनीय चर्चा का केली, बैठकीत जाणीवपुर्वक गोंधळ घालण्याचा कुणी प्रयत्न केला का, मराठ्यांचे कोण दुश्मन असतील तर आम्ही त्यांच्या छाताडावर उभारू. यावर जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले,तिथे कोणतेही चुकीचे वक्तव्य झालेले नाही, त्यामुळे कपोलकल्पित निराधार गोष्टींवर विश्वास ठेवू नका. शासकीय कार्यालयात आपण काय बोलतो याकडे लक्ष द्या. हे कायद्याचे राज्य आहे, नियमाने चाला. यावेळी सुनील मोदी, बाबा पार्टे, आर. के. पोवार, माजी नगरसेविका रुपाराणी निकम, संगीत खाडे, कमलाकर जगदाळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारीMaratha Reservationमराठा आरक्षण