डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी बनविले ध्वनी उत्सर्जन नियंत्रित करणारे ॲक्वा सायलन्सर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:24 IST2021-01-23T04:24:33+5:302021-01-23T04:24:33+5:30
इचलकरंजी : येथील डीकेटीईच्या मेकॅनिकल विभागातील चार विद्यार्थ्यांनी एस. आय. व सी. आय. इंजिनमधील ध्वनी व वायू उत्सर्जन नियंत्रित ...

डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी बनविले ध्वनी उत्सर्जन नियंत्रित करणारे ॲक्वा सायलन्सर
इचलकरंजी : येथील डीकेटीईच्या मेकॅनिकल विभागातील चार विद्यार्थ्यांनी एस. आय. व सी. आय. इंजिनमधील ध्वनी व वायू उत्सर्जन नियंत्रित करणारे ॲक्वा सायलन्सर हे यंत्र बनविले आहे. हा उपक्रम ऑटोमोबाइल उद्योगासाठी व विविध प्रदूषण समस्या सोडविण्यासाठी मार्गदर्शक ठरणारा आहे. चिन्मय चौगुले, निरंजन चौगुले, विनय भांडेकर व सुरज कोष्टी यांनी प्रा. डॉ. ए. डी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे यंत्र बनविले आहे. जगभरात दिवसेंदिवस ऑटोमोबाइल इंजिनचा वापर वाढत चालला आहे. या इंजिनमधून निर्माण होणाऱ्या ध्वनी, वायू व इतर पर्यावरणीय समस्यांना लोकांना तोंड द्यावे लागत आहे. तेव्हा अशा प्रदूषणांवर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. या संकल्पनेवर या विद्यार्थ्यांनी ॲक्वा सायलन्सर यंत्र विकसित केले. या सायलन्सरमुळे होणारे प्रदूषण नियंत्रित करण्यास मदत होईल. हे सायलन्सर कमी खर्चात तयार केले असून, बीएस-६ नॉर्मस्ममध्ये असणाऱ्या उत्सर्जन घटकांचेदेखील याच्यामध्ये तंतोतंत पालन केले आहे. या सायलन्सरमधून होणारे वायू उत्सर्जन हे बीएस-६ च्या नॉर्मसपेक्षा कमी आहे. या प्रकल्पास राष्ट्रीय स्तरावरील 'जागृती प्रोजेक्ट कॉम्पिटीशन इन इग्निशन २ के २०' मध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. या संशोधनासाठी प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले व प्रा. डॉ. व्ही. आर. नाईक यांचे मार्गदर्शन लाभले.
(फोटो ओळी) २२०१२०२१-आयसीएच-०३ डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी बनविले ध्वनी व वायू उत्सर्जन नियंत्रित करणारे ॲक्वा सायलन्सर बनविले आहे.