राजाराम साखर कारखान्याच्या सभेपुर्वीच 'मंजूर'चे फलक
By राजाराम लोंढे | Updated: September 29, 2023 11:02 IST2023-09-29T11:02:45+5:302023-09-29T11:02:57+5:30
सत्ताधारी गटाने सकाळी नऊ पासून च समर्थक सभासद जागेवर बसवले होते.

राजाराम साखर कारखान्याच्या सभेपुर्वीच 'मंजूर'चे फलक
कोल्हापूर - कसबा बावडा ( ता। करवीर) येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या सभेसाठी मोठी गर्दी झाली असून सभेपुर्वीच मंजूर मंजुर चे फलक झळकत होते.
पोटनियम दुरुस्ती वरुन सभा वादळी होणार आहे. कोणत्याही परिस्थितीत पोटनियम मंजूर करायचाच यासाठी सत्ताधारी गटाने जय्यत तयारी केली आहे. तर, पोटनियम दुरुस्ती हाणून पाडण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. त्यामुळेच सभा स्थळी तणावाचे वातावरण आहे.
विरोदकांची को़डी
सत्ताधारी गटाने सकाळी नऊ पासून च समर्थक सभासद जागेवर बसवले होते. त्यामुळे विरोधकांना सभा स्थळी पोहचताना दमछाक होत आहे.