शहरं
Join us  
Trending Stories
1
"'मी गौमांस खातो, कोण मला आडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवण करतायेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
2
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
3
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
4
तपोवनातील वृक्षतोडीविरोधात आता अण्णा हजारे मैदानात; विचारणा करत म्हणाले, “कुंभमेळा...”
5
“लाडक्या बहिणींना २१०० रुपये द्यावे, अन्यथा CM फडणवीसांनाच घरी बसावे लागेल”: उद्धव ठाकरे
6
शालेय सहलींसाठी STलाच उदंड प्रतिसाद; एका महिन्यात तब्बल २२४३ बस आरक्षित, १० कोटींची कमाई
7
अमित शाह यांनी '102 डिग्री' ताप असतानाही संसदेत 'मत चोरी'वर दिलं उत्तर, सभागृह सोडून गेले राहुल गांधी
8
IPL 2025 Auction : ‘छप्पर फाड’ कमाई करण्यासाठी परदेशी खेळाडूनं खेळला असा डाव; सगळेच झाले थक्क!
9
SDM नां केली मारहाण, ४ गर्लफ्रेंड, त्यापैकी ३ प्रेग्नंट, बोगस IAS चा प्रताप, कोण आहे तो?  
10
नवा ट्रेंड! स्किन केअरसाठी 'हे' खास ड्रिंक पीत आहेत Gen-Z; पण खरंच किती होतो फायदा?
11
देवेंद्र फडणवीसांनी 'पांघरूण खातं' सुरु करावं आणि त्याचं मंत्री व्हावं- उद्धव ठाकरे
12
दिल्ली दंगलीतील आरोपी उमर खालिदला दिलासा; न्यायालयाकडून जामीन मंजूर
13
उत्तर प्रदेशसह या ६ राज्यांमध्ये SIR साठीची मुदत वाढवली, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय  
14
"रोहित शर्मा मैदानात जेव्हा 'तसा' वागतो, ते खूप विचित्र वाटतं"; यशस्वी जैस्वाल अखेर बोललाच
15
“प्राचीन मंदिर पाडून RSSचे कार्यालय”; उद्धव ठाकरेंची अमित शाहांवर टीका, ‘तो’ फोटोही दाखवला
16
अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार, सशक्त लोकायुक्तावरून राज्य सरकारला दिला असा इशारा...  
17
थंडीत फ्रीज बंद करणं पडू शकतं महागात; वीज वाचवण्याच्या नादात करू नका 'ही' चूक
18
Technology: सावधान! तुमच्या फोन स्क्रीनवरील 'हे' तीन रंगीत ठिपके देतात हॅकिंगची सूचना
19
"बिबट्यांना पाळीव प्राण्यांचा दर्जा द्या", आमदार रवी राणा यांची अजब मागणी 
20
उंदीर मारण्याचं औषध, सल्फास, तुटलेला मोबाईल...; नवरदेवाचा संशयास्पद मृत्यू, आज होतं लग्न
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ‘गोकुळ’चे संचालक मंडळ आता २५ सदस्यांचे, सभेत पोटनियम दुरुस्तीस मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 11:54 IST

शौमिका महाडिक यांनी केला विरोध, दहा वर्षांत पहिल्यांदाच सव्वादोन तास चालली सभा

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या ६३व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संचालक मंडळाची संख्या २१ वरून २५ करण्यास पोटनियम दुरुस्तीस मान्यता देण्यात आली. विरोधी संचालिका शौमिका महाडिक यांनी या दुरुस्तीस सभेत विरोध केला. नेत्यांच्या नावांची घोषणाबाजी वगळता सभा शांततेत पार पडली.अध्यक्ष नविद मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी संघाच्या पंचतारांकित वसाहतीमधील पशुखाद्य कारखाना कार्यस्थळावर सभा झाली. विशेष म्हणजे गेल्या दहा वर्षांत पहिल्यांदाच सव्वादोन तास सभा चालली.

वाचा: म्हैस वासाच्या दुधाला १२ तर गायीला ८ रुपये देणार, नविद मुश्रीफ यांची घोषणा तब्बल एक तासाच्या प्रास्ताविकात अध्यक्ष मुश्रीफ म्हणाले, संघाच्या उलाढालीत २९६ कोटीने वाढ झाली असून, दूध उत्पादकांना राज्यातील सर्वाधिक दूध खरेदी दर दिला आहे. संघाच्या ठेवीबरोबरच गुंतवणुकीमध्ये मोठी वाढ करण्यात यश आले असून, प्रत्येक तालुक्याला संघात प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी संचालक मंडळाची संख्या २५ करण्याचा निर्णय घेतला असून, त्या पोटनियमास मंजुरी द्यावी, असे आवाहन केल्यानंतर उपस्थितांनी हात उंचावत मंजुरी दिली. 

वाचा: मुश्रीफ-सतेज पाटील गट्टी घट्ट, गोकुळ'च्या सभेत निवडणुकीतील संभाव्य युतीत पडला मिठाचा खडाया मुद्द्याला हरकत घेत संचालक वाढीस आमचा विरोध असल्याचे शौमिका महाडिक यांनी सांगितले. कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांनी अहवाल वाचन केले. शशिकांत पाटील-चुयेकर यांनी आभार मानले. सभेला वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांच्यासह सत्तारूढ आघाडीचे नेते उपस्थित होते.‘अमल’ यांचेही मानले आभारअध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री व जिल्ह्यातील सर्वच नेत्यांनी ‘गोकुळ’च्या प्रगतीत सहकार्य केल्याबद्दल आभार मानले. विशेष म्हणजे, त्यांनी आमदार अमल महाडिक यांचाही उल्लेख केला.मागील कारभाराचा अहवाल म्हणून फोटो नाहीतताईच्या (शौमिका महाडिक) प्रश्नांना लाडका भाऊ निश्चितच समाधानकारक उत्तरे देईल, असे अगोदरच सांगत अध्यक्ष मुश्रीफ म्हणाले, अहवालात भाजपच्या स्थानिक नेत्यांचे फोटो का नाहीत? असा प्रश्न आहे. हा अहवाल मागील कारभाराचा आहे, लहान भावाच्या कारकिर्दीतील नसल्याने कदाचित फोटो छापले नसतील.

चुयेकरांच्या फोटोबद्दल दिलगिरीसंघाने दूध संस्थांना दिलेल्या घड्याळ भेटवस्तूमध्ये संस्थापक आनंदराव पाटील-चुयेकर यांचा फोटो नसल्याचे एका संस्था प्रतिनिधीने निदर्शनास आणून दिले. यावर, अनावधानाने फोटो राहिला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत असल्याचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांनी सांगितले.बाप से बेटा सवाई..नविद मुश्रीफ हे ‘गोकुळ’मध्ये पहिल्यांदाच संचालक व अध्यक्ष झाले. निवडणुकीच्या तोंडावरील सभा असल्याने ‘नविद’ यांच्या नेतृत्वाचा कस लागला होता; पण त्यांनी सव्वादोन तास सभा चालवून आपणही कमी नसल्याचे दाखवून दिले. दहा वर्षे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ हे केडीसीसी बँकेची सभा एकहाती चालवतात. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवल्याची चर्चा सभास्थळी होती.

सभेच्या बाहेर सत्तारूढ गटासोबत, आत विरोधातशौमिका महाडिक या दुपारी बारा वाजता सभास्थळी आल्यानंतर त्या अध्यक्ष नविद मुश्रीफ व सत्तारूढ गटाच्या संचालकांसोबत संस्था प्रतिनिधींच्या स्वागतासाठी उभा राहिल्या. सभेच्या ठिकाणी मात्र त्या सभासदांमध्ये बसल्या होत्या.