गडहिंग्लज बाजार समितीच्या अशासकीय प्रशासक मंडळास मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:20 IST2020-12-09T04:20:26+5:302020-12-09T04:20:26+5:30
गडहिंग्लज : गडहिंग्लज, आजरा, चंदगड व कागल असे साडेतीन तालुके कार्यक्षेत्र असणाऱ्या गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीवर अशासकीय प्रशासक ...

गडहिंग्लज बाजार समितीच्या अशासकीय प्रशासक मंडळास मंजुरी
गडहिंग्लज :
गडहिंग्लज, आजरा, चंदगड व कागल असे साडेतीन तालुके कार्यक्षेत्र असणाऱ्या गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्तीस मंगळवारी मंजुरी मिळाली.
प्रशासक मंडळाच्या अध्यक्षपदी अभय देसाई (अडकूर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अन्य सदस्यांमध्ये मुकुंद देसाई (आजरा), जयकुमार मुन्नोळी (हलकर्णी), भीमराव राजाराम (जखेवाडी), जानबा चौगुले (तुर्केवाडी), धनाजी तोरस्कर (मांगनूर), सोमगोंडा आरबोळे (मुगळी), रोहित मांडेकर, दिलीप माने, राजशेखर यरटे, सुनील शिंत्रे (गडहिंग्लज), विक्रम चव्हाण-पाटील (यशवंतनगर), संजय उत्तूरकर (उत्तूर), दिग्विजय कुराडे (ऐनापूर), संभाजी पाटील (आजरा), प्रभाकर खांडेकर (शिनोळी), संभाजी भोकरे (हसूर), लगमाण्णा कांबळे (वडगाव), संपत देसाई (पेरणोली), राजेंद्र गड्यान्नावर (मुत्नाळ), विजय वांगणेकर (आर्दाळ) आदींचा समावेश आहे.
-------------------------------
* अभय देसाई : ०८१२२०२०-गड-१२