शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर महापालिकेतील ५२६ रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्यास तत्त्वत: मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2024 13:24 IST

अटी शिथिल करण्यासाठी प्रस्ताव देण्याची सूचना

कोल्हापूर : महापालिकेतील ५२६ रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यास मंत्रालयात मंगळवारी झालेल्या बैठकीत तत्त्वत: मान्यता देण्यात आली. रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्याबाबत येणाऱ्या अडचणींपैकी प्रशासकीय खर्चाची ३५ टक्क्यांची अट तसेच वयोमर्यादेची अट शिथिल करण्यासंबंधीचा प्रस्ताव लवकरात लवकर पाठवावा, अशा सूचना महापालिका अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत मंत्रालयात बैठक झाली. यावेळी नगरविकास सचिव के. एच गोविंदराज वित्त विभागाचे सचिव, महापालिका प्रशासक के. मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त केशव जाधव, सहायक आयुक्त संजय सरनाईक, शहर अभियंता हर्षजित घाटगे, जलअभियंता नेत्रदीप सरनोबत, अमृत योजनेचे संचालक मनोहर हिरे, संघटना प्रतिनिधी संजय भोसले, दिनकर आवळे, विजय वणकुद्रे, अजित तिवले उपस्थित होते.गेल्या अनेक वर्षांपासून महानगरपालिका सेवेत रोजंदारी म्हणून काम करणाऱ्या ५२६ कर्मचाऱ्यांना कायम करण्याची मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे संघटनेने केली होती. त्यानुसार मंगळवारी मंत्रालय पातळीवर बैठक घेण्याचे ठरले होते. त्यानुसार ही बैठक पार पडली. क्षीरसागर मात्र अन्य एक बैठकीत व्यस्त राहिल्याने या बैठकीस अनुपस्थित होते.रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्यास बैठकीत तत्त्वत: मान्यता देण्यात आली. परंतु या कर्मचाऱ्यांना कायम करण्यास ३५ टक्के प्रशासकीय खर्चाची, कर्मचाऱ्यांचे रोस्टर तसेच वयोमर्यादेची अट अडथळा ठरत होती. परंतु बरीच वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम करण्याकरिता या अटी शिथील करण्याकरिता महापालिका प्रशासनाने सुधारित प्रस्ताव देण्यास सांगण्यात आले.रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम केल्यास महापालिकेच्या तिजोरीवर सहा कोटी ५० लाखांचा बोजा पडणार आहे. त्यामुळे राज्य शासनाने महिन्याला दोन कोटी जीएसटीचे अनुदान वाढवून द्यावे, अशी विनंती महापालिकेतर्फे करण्यात आली. त्यावेळी वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे हा प्रस्ताव देण्यात येईल, असे वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.केएमटीच्या रोजंदारीवर काम करणाऱ्या ७० चालक व ८० वाहकांनाही सेवेत कायम करण्यावर चर्चा झाली. त्यास तत्त्वत: मान्यता देण्यात आली. या सर्व कर्मचाऱ्यांना कायम केल्यास महिन्याला २७ लाखांचा बोजा पडणार असून तो महापालिका प्रशासन उचलणार आहे.

बापट कॅम्पसाठी अमृतमधून ४५ कोटीअमृत योजना २ मधून बापट कॅम्प येथील ड्रेनेज लाईन व सांडपाणी प्रक्रिया करण्याकरिता १८५ कोटींचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता, परंतु प्रत्यक्षात १४० कोटी मंजूर झाले आहेत. त्यामुळे हे काम रेंगाळणार होते म्हणून राज्य नगरोत्थान योजनेतून ४५ कोटी रुपयांचा निधी देण्याचे बैठकीत अमृत योजनेच्या संचालकांनी मान्य केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर