शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
6
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
7
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
8
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
9
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
10
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
11
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
12
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
13
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
14
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
15
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
16
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
17
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
18
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
19
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
20
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा

राज्यात दहा एमबीबीएस महाविद्यालयांना मान्यता - मंत्री हसन मुश्रीफ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 19:00 IST

पालकमंत्री पदाबाबत तीन नेते ठरविणार

कोल्हापूर : राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाची आपणावर दुसऱ्यांदा जबाबदारी दिल्याचा आनंद आहे. या माध्यमातून संबधित विभागातील प्रलंबित कामांना गती देण्याचा प्रयत्न राहणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील शासकीय वैद्यकीयमहाविद्यालयांसह रुग्णालयांची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.मंत्री मुश्रीफ यांना वैद्यकीय शिक्षण खाते मिळाल्यानंतर ते बोलत हाेते. मंत्री मुश्रीफ म्हणाले, मागील सरकारमध्ये वैद्यकीय शिक्षण खाते माझ्याकडे होते. पण केवळ तेरा महिन्यांचा कालावधी मिळाला. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यासाठी अद्ययावत ११०० बेडचे रुग्णालय, बीएचएमएस, बीएएमएस, योगाचे महाविद्यालय मंजूर करून आणले आहे. ही सर्व कामे पूर्णत्वाकडे न्यायची आहेत. त्याचबरोबर राज्यात दहा ते अकरा एमबीबीएस शासकीय महाविद्यालयांना मान्यता दिली आहे. त्याचीही तयारी करायची आहे. आगामी काळात काळ मर्यादा निश्चित करून ही कामे पूर्ण करण्याचा मानस आहे.आरोग्याचे प्रश्न सोडविण्यास मदतजिल्ह्याला वैद्यकीय शिक्षणासह सार्वजनिक आरोग्य ही दोन महत्त्वाची खाती मिळाल्याबद्दल विचारले असता, मंत्री मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्यात अनेक वर्षांपासून आरोग्याचे काही प्रश्न आहेत. त्याची सोडवणूक करण्यासाठी मदत होणार आहे.पालकमंत्री पदाबाबत तीन नेते ठरविणारकोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून रस्सीखेच सुरू असली तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे जो निर्णय घेतील, त्याप्रमाणे काम करण्याची आमची सगळ्यांची तयारी असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफMedicalवैद्यकीयcollegeमहाविद्यालयhospitalहॉस्पिटल