कोरोना काळातील वडणगे पॅटर्नचे जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:18 IST2021-06-04T04:18:59+5:302021-06-04T04:18:59+5:30
आज कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांना कोरोना काळात ग्रामस्तरावरील यंत्रणा यशस्वीपणे कशी हाताळावी आणि कोरोना प्रदर्भाव ...

कोरोना काळातील वडणगे पॅटर्नचे जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतूक
आज कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांना कोरोना काळात ग्रामस्तरावरील यंत्रणा यशस्वीपणे कशी हाताळावी आणि कोरोना प्रदर्भाव रोखवा याकरिता मार्गदर्शन वेबिनार मा. जिल्हाधिकारी आदरणीय दौलत देसाई यांनी आयोजित केले होते. या वेबिनारमध्ये या कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील चार सरपंचांना आमंत्रित करण्यात आलं होतं.
त्यामध्ये वडणगे पॅटर्न ही संकल्पना यशस्वी करून गावातील पहिल्या लाटेतील यशस्वी वाटचालीचे सादरीकरण करणेसाठी वडणगेचे सरपंच सचिन चौगले यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी सरपंच सचिन चौगले यांनी वडणगे पॅटर्नसह कोरोना काळातील ग्राम दक्षता समिती, प्रभाग समितीच्या कामाचे विस्तृत सादरीकरण केले. या वेबिनारमध्ये जिल्ह्यातील ७०० हून अधिक ग्रामपंचायतीने आपला सहभाग नोंदवला.
फोटो ओळी :- कोरोना काळातील वडणगे पॅटर्नच्या कामाचे विस्तृत सादरीकरण करताना सरपंच सचिन चौगले जिल्हाधिकारी दौलत देसाई.
फोटो koldesk ला पाठवला आहे.