शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

नियुक्ती ठोक मानधनावर; तरीही जीवघेण्या संकटांशी सामना, कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन विभागात ७६ पदे रिक्त

By उद्धव गोडसे | Updated: March 9, 2026 16:19 IST

जंगली प्राण्यांना पकडण्याचेही काम

उद्धव गोडसेकोल्हापूर : कुठे आग लागलेली असो वा नैसर्गिक आपत्ती...मदतीसाठी पहिला कॉल जातो तो अग्निशमन दलास. स्वतःचा जीव धोक्यात घालून अग्निशमन दलाचे जवान संकटग्रस्तांना वाचवतात. कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागात तब्बल ७६ पदे रिक्त आहेत. सध्या कार्यरत असलेल्या ६२ पदांपैकी ४३ कर्मचारी ठोक मानधन तत्त्वावर काम करतात. तरीही संकट काळात ते मदतीसाठी धावून जातात आणि आपले कर्तव्य चोखपणे बजावतात.आगीच्या घटनांसह झाड पडणे, घरांची पडझड, विजेचा धक्का, झाडांवर पतंगाच्या मांज्यात अडकलेल्या पक्ष्यांना मुक्त करणे, गटर्समध्ये अडकलेली जनावरे सुखरूप बाहेर काढणे...अशा अनेक दुर्घटनांमध्ये अग्निशमन दलाचे जवान मदतीला धावून जातात. लोकांना वाचवताना जीवघेण्या संकटांशी त्यांचा सामना होतो. आगीच्या ज्वाला झेलत ते लोकांना सुखरूप बाहेर काढतात. कधी झाडांवर चढावं लागतं, तर कधी उंच इमारतींवर लटकावं लागतं. वायुगळती रोखताना स्वतःच्या जीवाला धोका असल्याची जाणीव असूनही ते जखमीचे काम फत्ते करतात. कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन दलातील जवानांनी केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेली भीषण आग विझविली. गगनबावडा आणि शाहूवाडी मार्गावर टँकर उलटून झालेली वायू गळती रोखली. सर्किट बेंचसमोर रस्त्यावर पडलेले भले मोठे झाड अवघ्या दोन तासांत हटवले. अनेकदा पंचगंगेत बुडणाऱ्यांना वेळीच बाहेर काढून जीवदान दिले. जोखमीचे काम करताना जवानांना किरकोळ दुखापती होतात. साधनसामग्रीचा वापर, प्रशिक्षण आणि कामातील कौशल्यामुळे मोठ्या दुर्घटना टाळणे शक्य होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन दलाचे शहरात सहा फायर स्टेशन आहेत. अधिकारी आणि जवानांसह एकूण १३८ पदे मंजूर आहेत. मात्र, प्रत्यक्षात केवळ ६२ कर्मचारी सध्या कार्यरत आहेत. यातील १९ कर्मचारी कायमस्वरूपी वेतन तत्त्वावर आहेत, तर ४३ कर्मचारी ठोक मानधन तत्त्वावर राबतात. शहरासह ग्रामीण भागातही ते मदतीला पोहोचतात. कामाचा प्रचंड ताण आणि अपुरे मनुष्यबळ असूनही ते जिल्ह्याच्या सुरक्षेसाठी २४ तास सज्ज असतात.

जंगली प्राण्यांना पकडण्याचेही कामअग्निशमन दलाच्या कामाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. अलीकडे जंगली प्राण्यांचा शहरात शिरकाव होत असल्याने त्यांना पकडणे, अटकाव करणे, त्यांचे हल्ले रोखण्याचेही काम जवानांना करावे लागते. शहरात आलेल्या बिबट्यांना पकडण्यात आणि गव्यांना हुसकावून लावण्यात त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले.

संकटात सापडलेल्या जिवांचे रक्षण करणे हे आमचे ब्रीद आणि प्रथम कर्तव्य आहे. कायमस्वरूपी नियुक्तीचा मुद्दा प्रशासनाचा आहे. आमचे सर्व कर्मचारी नेहमीच पूर्ण योगदान देऊन सेवा बजावतात. - मनीष रणभिसे, अग्निशमन दल प्रमुख

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Fire Department Faces Risks with Vacancies and Contract Workers

Web Summary : Kolhapur's fire department, with 76 vacancies, relies on contract workers facing life-threatening situations. Despite limited staff, they bravely handle fires, rescues, and animal control, showcasing dedication to public safety. They risk their own lives.