जिल्हा बॅँकेच्या ७० अनुकंपा कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 03:22 PM2020-03-11T15:22:00+5:302020-03-11T15:23:02+5:30

कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या ७० अनुकंपा कर्मचाऱ्यांना नियुक्तिपत्राचे वाटप बॅँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या ...

Appointment Letter to 3 Compassionate Employees of District Bank | जिल्हा बॅँकेच्या ७० अनुकंपा कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्रे

जिल्हा बॅँकेतील अनुकंपा तत्त्वावरील ७० कर्मचाऱ्यांना बॅँकेचे अध्यक्ष व मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते नियुक्तिपत्रे देण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने, प्रशासन व्यवस्थापक जी. एम. शिंदे यांच्यासह संचालक व अधिकारी उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देजिल्हा बॅँकेच्या ७० अनुकंपा कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्रे

कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या ७० अनुकंपा कर्मचाऱ्यांना नियुक्तिपत्राचे वाटप बॅँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. बॅँकेचे ८० मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांची अनुकंपाखाली नियुक्ती करावी, अशी मागणी कर्मचारी युनियनची होती. युनियन सोबत झालेल्या चर्चेनंतर पात्र ७० कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्याचा निर्णय घेतला.

निकषानुसार ज्यांच्याकडे पदवी अथवा तांत्रिक पदविका आहे, त्यांची लिपिक तर किमान सातवी उत्तीर्ण असणाऱ्यांना शिपाई म्हणून नेमणुका दिल्या. यावेळी माजी आमदार के. पी. पाटील, संचालक पी. जी. शिंदे, अनिल पाटील, आर. के. पोवार, भैया माने, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, उदयानी साळुंखे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने, प्रशासन व्यवस्थापक जी. एम. शिंदे, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

रणवीर चव्हाण यांची आठवण

साखर उद्योगातील कर्तव्यदक्ष व माहिती संपन्न अधिकारी आपण गमावला. बॅँकिंग, साखर उद्योग व उद्योगांमधील अडअडचणीत त्यांचा अभ्यास निष्णात असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.


 

 

Web Title: Appointment Letter to 3 Compassionate Employees of District Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.