उसाच्या वाहनांना रिफ्लेक्टर लावा

By Admin | Updated: November 21, 2015 00:21 IST2015-11-20T23:49:18+5:302015-11-21T00:21:40+5:30

शहर वाहतूक नियंत्रण शाखा : पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

Apply the sugarcane to the reflector | उसाच्या वाहनांना रिफ्लेक्टर लावा

उसाच्या वाहनांना रिफ्लेक्टर लावा

कोल्हापूर : अपघात टाळण्यासाठी जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर लावावा. वाहनचालकांनी पर्यायी तसेच सुचविण्यात आलेल्यापैकी सोयीच्या मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन शहर वाहतूक नियंत्रण शाखेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झालेला आहे. कारखान्यासाठी उसाची वाहतूक करणारे ट्रक, ट्रेलर्स व बैलगाड्या, आदींवर रिफ्लेक्टर (लाल, पांढरा, इत्यादी परावर्तक) लावले नसल्यामुळे यापूर्वी जिल्ह्यात अनेक ठिकाणी प्राणांतिक व गंभीर स्वरूपाचे अपघात झालेले आहेत. त्यामुळे या वाहनांवर रिफ्लेक्टर लावणे गरजेचे आहे. त्यामुळे इतर वाहनचालकांना धोक्याची आगाऊ सूचना मिळते व त्यामुळे अपघात टाळण्यास मदत होते. साखर कारखान्यास ऊसपुरवठा करणाऱ्या सर्व वाहनांवर कारखान्यामार्फत रिफ्लेक्टर लावून घ्यावेत. याबाबत संबंधितांना सूचना द्याव्यात, असेही प्रसिद्धीपत्रकाद्वारे सुचविण्यात आले आहे.
याशिवाय शहरात ये-जा करणाऱ्या अवजड, जड व मध्यम मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे वारंवार वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे. ती होऊ नये, शहरातील रहदारी सुरळीत राहावी व नागरिक-पादचारी यांना सुरक्षा मिळावी यासाठी सकाळी नऊ ते दुपारी १२ वाजेपर्यंत व दुपारी चार ते रात्री नऊ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रमुख मार्गावर प्रवेश बंद / पर्यायी मार्ग / मालाची चढउतार करण्यास मनाई करण्यात आली असल्याचे पोलीस निरीक्षक आर. आर. पाटील यांनी कळविले आहे. (प्रतिनिधी)

शहरात प्रवेश ठिकाणप्रवेश बंद करण्यात आलेले ठिकाण पर्यायी मार्ग
१) कळंबा नाकाहॉटेल इंदिरासागर चौक, संभाजीनगर१) इंदिरासागर चौक उजवे वळण, रिंग रोडने हायवे कँटीन मार्गे
२) कळंबा साई मंदिर डावे वळण रिंग रोडने नवीन वाशी नाका मार्गे
२) नवीन वाशी नाकानवीन वाशी नाका१) नवीन वाशी नाका उजवे वळण रिंग रोडने कळंबा साईमंदिर मार्गे
२) नवीन वाशी नाका डावे वळण रिंगरोडने फुलेवाडी नाका मार्गे
३) फुलेवाडी नाकागंगावेश १) गंगावेश डावे वळण, शिवाजी पूल-सीपीआर चौक डावे वळण
२) फुलेवाडी नाका उजवे वळण, रिंग रोडने नवीन वाशी नाकामार्गे पुढे मार्गस्थ
४) शिवाजी पूलसीपीआर चौक, गंगावेश १) सीपीआर चौक डावे वळण, पोस्ट आॅफिस चौक, उजवे वळण मेनन
चौक डावे वळण आयलंड चौक-ताराराणी चौकमार्गे पुढे मार्गस्थ व रंकाळा बसस्थानक उजवे वळण
२) उजवे वळण गंगावेश-रंकाळा बसस्थानक -ताराबाई रोड,साकोली कॉर्नर-रंकाळा टॉवर मार्गे
५) शिये नाकासीपीआर चौक१) सीपीआर चौक उजवे वळण, शिवाजी पूल/गंगावेश -रंकाळा बसस्थानक-ताराबाई रोडने पुढे मार्गस्थ
२) राष्ट्रीय महामार्गावरून सोयीनुसार
६) शिरोली नाका ताराराणी चौक१) ताराराणी चौक डावे वळण रेल्वे उड्डाणपूल -हायवे कॅँटीन रिंग रोड मार्गे सोयीनुसार
२) ताराराणी चौक उजवे वळण, मेनन आयलंड चौक-पोस्ट आॅफिस चौकमार्गे
७) शाहू नाका सायबर चौक१) सायबर चौक डावे वळण, रिंग रोडने
२) राष्ट्रीय महामार्गावरून पुढे
८) उचगाव नाकाकोयास्को चौक१) कोयास्को चौक उजवे वळण, हायवे कॅँटीन रिंग रोडने पुढे
९) आर. के. नगरशेंडा पार्क १) शेंडा पार्क सोयीनुसार डावे/उजवे वळण घेऊन रिंग रोडने

Web Title: Apply the sugarcane to the reflector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.