शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

वारणेसह १२ कारखान्यांना आरआरसी नोटीस लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 18:54 IST

थकीत एफआरपीप्रश्नी कोल्हापूर विभागातील १२ कारखान्यांवर आरआरसींतर्गत, तर २३ कारखान्यांना उस नियंत्रण आदेशांतर्गत कारवाईच्या अधिकृत नोटिसा गुरुवारी लागू झाल्या. आरआरसीची कारवाई झालेल्या कारखान्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सात, तर सांगलीतील पाच कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांची  शुक्रवारी पुण्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्यासमोर सुनावणी होत आहे. यात साखर जप्तीसह १५ टक्के व्याजासह एफआरपी देण्याबाबत पुढील कारवाईवर चर्चा होणार आहे.

ठळक मुद्देवारणेसह १२ कारखान्यांना आरआरसी नोटीस लागूकारखानदारांची शुक्रवारी पुणे आयुक्तालयात सुनावणी

कोल्हापूर: थकीत एफआरपीप्रश्नी कोल्हापूर विभागातील १२ कारखान्यांवर आरआरसींतर्गत, तर २३ कारखान्यांना उस नियंत्रण आदेशांतर्गत कारवाईच्या अधिकृत नोटिसा गुरुवारी लागू झाल्या.

आरआरसीची कारवाई झालेल्या कारखान्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सात, तर सांगलीतील पाच कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांची  शुक्रवारी पुण्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्यासमोर सुनावणी होत आहे. यात साखर जप्तीसह १५ टक्के व्याजासह एफआरपी देण्याबाबत पुढील कारवाईवर चर्चा होणार आहे.चालू गळीत हंगामाची वाटचाल सांगतेकडे सुरू झाली तरी अजूनही तुटलेल्या उसाची बिले शेतकऱ्यांना मिळालेली नाहीत. एकरकमी एफआरपी देता येत नसल्याचे सांगत काही कारखान्यांनी ८0:२0 च्या फॉर्म्युल्याप्रमाणे पहिली उचल म्हणून प्रतिटन २३00 रुपयांपर्यंतची उचल देऊ केली आहे. त्याप्रमाणे त्यांनी नोव्हेबरअखेरपर्यंतची बिले दिली आहेत.

डिसेंबरपासूनची सर्व बिले थकीत ठेवली आहेत. उस नियंत्रण आदेश १९६६ नुसार उस तुटल्यानंतर १४ दिवसांच्या आत बिल जमा न केल्यास १५ टक्के व्याजासह एफआरपी देणे बंधनकारक आहे, असे न केल्यास त्यांच्यावर आरआरसीअंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत साखर जप्तीची कारवाई होते.त्यानुसार कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे. कारवाईच्या या फेऱ्यात कोल्हापूर विभागात येणाऱ्या कोल्हापूर व सांगली या दोन जिल्ह्यांतील ३५ कारखाने अडकले आहेत. यातही एकही रुपया आतापर्यंत अदा न केलेल्या १२, तर २३00 प्रमाणे जमा केलेल्या २३ कारखान्यांचा समावेश आहे. १२ कारखान्यांवर साखर जप्तीची कारवाई आठ दिवसांत सुरू होत आहे, तर २३00 रुपये जमा केलेल्या कारखान्यांनी उर्वरित रक्कम व्याजासह तातडीने देण्याबाबतचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

आरआरसी लागू झालेले कारखानेकोल्हापूर : दत्त शिरोळ, जवाहर हुपरी, वारणा, पंचगंगा, इको केन, संताजी घोरपडे, गुरुदत्त शुगर्स.सांगली : केन अ‍ॅग्रो, विश्वास, निनाई दालमिया, वसंतदादा, महाकाली.१९६६ मधील कलम ३(३) अन्वये लागू झालेल्या नोटिसाकोल्हापूर : आजरा, नलवडे गडहिंग्लज, भोगावती, राजाराम, शाहू कागल, डी. वाय. पाटील, बिद्री, कुंभी-कासारी, मंडलिक हमीदवाडा, उदयसिंग गायकवाड, अथणी शुगर्स.सांगली : उदगिरी शुगर्स, सोनहिरा, सद्गुरूशुगर्स, सर्वोदय, राजारामबापू वाटेगाव व साखराळे, मोहनराव शिंदे, ओलम शुगर्स, रिलायबल शुगर्स, क्रांती अग्रणी, हुतात्मा. 

 

 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर