शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरसह पाच जिल्ह्यांतील नऊ प्रलंबित गुन्हे मार्गी लावा, ‘वारणे’च्या तपासावर मार्गदर्शक सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 19:44 IST

कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील नऊ प्रलंबित गुन्ह्यांचा तपास लवकर पूर्ण करून ते मार्गी लावा, अशा सूचना ‘सीआयडी’चे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील रामानंद यांनी देत कोल्हापूर परिक्षेत्राच्या कार्यालयीन कामकाजाचा आढावा घेत झाडाझडती घेतली. बुधवारी दिवसभर त्यांनी तपासणी केली.

ठळक मुद्दे‘सीआयडी’चे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील रामानंद यांच्या सूचनाविभागीय कार्यालयाची झाडाझडती : ‘वारणे’च्या तपासावर मार्गदर्शक सूचना

कोल्हापूर : कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील नऊ प्रलंबित गुन्ह्यांचा तपास लवकर पूर्ण करून ते मार्गी लावा, अशा सूचना ‘सीआयडी’चे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील रामानंद यांनी देत कोल्हापूर परिक्षेत्राच्या कार्यालयीन कामकाजाचा आढावा घेत झाडाझडती घेतली. बुधवारी दिवसभर त्यांनी तपासणी केली.दरम्यान, रामानंद हे वार्षिक तपासणीसाठी आले असतानाच वारणानगर चोरी प्रकरण पुन्हा गाजल्याने त्यांनी या चोरी प्रकरणाचा तपास कुठेपर्यंत आला आहे, त्यामध्ये प्रगती आहे का, याची चाचपणी करीत तपासासंबंधी मार्गदर्शक सूचना ‘सीआयडी’चे पोलीस अधीक्षक डॉ. दिनेश बारी यांना केल्या.राज्य गुन्हे अन्वेषण शाखेचे (सीआयडी) पाच जिल्ह्यांचे विभागीय कार्यालय कोल्हापुरातील शनिवार पेठ येथे आहे. या कार्यालयाच्या कामकाजाची वार्षिक तपासणी करण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक रामानंद बुधवारी कोल्हापुरात आले. त्यांनी सकाळी दहा वाजता कार्यालयास भेट देऊन पोलीस अधीक्षक डॉ. बारी यांच्यासह पोलीस उपअधीक्षक, निरीक्षक, उपनिरीक्षक, लिपिक यांच्या मुलाखती घेतल्या.

वर्षभरात पाच जिल्ह्यांतून किती गुन्ह्यांचा तपास सुरू आहे, याची माहिती घेतली असता नऊ गुन्ह्यांचा तपास अपूर्ण असल्याचे दप्तरी दिसून आले. गुन्हे प्रलंबित का आहेत, त्यावर कोणत्या पद्धतीने तपास सुरू आहे, कोणाकडे तपास आहे, तपासामध्ये प्रगती आहे का, तपासातील त्रुटी, आदी मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करीत प्रश्नांची सरबत्ती केली.

प्रलंबित नऊ गुन्हे तत्काळ मार्गी लावा, त्यांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर करा, अशा सूचना रामानंद यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. वारणा शिक्षण मंडळाच्या शिक्षक कॉलनीतील चोरी प्रकरणाच्या तपासातील प्रगती त्यांनी विचारून घेतली. त्यासाठी मार्गदर्शक सूचना केल्या.कार्यालयीन अडचणी दूर करण्याची विनंती‘सीआयडी’चे येथील कार्यालय पाच जिल्ह्यांचे आहे. ऐतिहासिक आणि मोडकळीस आलेल्या लाकडी इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर अडगळीच्या जागी हे कार्यालय आहे. येथे अधिकाऱ्यांना बसण्यासाठी पुरेशी जागा नाही. आरोपींना स्वतंत्रपणे ठेवून त्यांच्याकडे चौकशी करण्यासाठी अद्ययावत कोठडी नाही.

अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना स्वतंत्र स्वच्छतागृह नाही. महिला कर्मचाऱ्यांसाठी चेंजिंग रूम नाही. अशा बिकट परिस्थितीत या ठिकाणी काम करावे लागते. येथून हे कार्यालय अन्य ठिकाणी हलवावे. त्यासाठी नवीन जागेची आणि इमारतीची तरतूद करावी, आदी कार्यालयीन अडचणी दूर करण्याची विनंती ‘सीआयडी’च्या अधिकारी प्रशासनाने विशेष पोलीस महानिरीक्षक रामानंद यांच्याकडे केली.

 

टॅग्स :Policeपोलिसkolhapurकोल्हापूर