शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

राहूल पाटील, अमल महाडिक, राहुल आवाडे, नवीद मुश्रीफ यांनी नेले अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 12:07 IST

Gokul Milk Elecation kolhapur- गोकूळ निवडणुकीसाठी अर्ज नेण्याच्या पहिल्याच दिवशी तब्बल ७६ जणांनी २६० अर्ज नेले तर ७ जणांनी ते लगेच दाखलही केले. यात नेहमीप्रमाणे बडे नेते व त्यांच्या वारसदारांचा भरणा दिसत आहे. महादेवराव महाडीक यांचा मुलगा अमल , आमदार पी.एन. पाटील मुलगा राहूल , ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा मुलगा नविद, आमदार प्रकाश आवाडे यांचा मुुलगा राहूल यांचा अर्ज नेणाऱ्यांत प्रामुख्याने समावेश आहे.

ठळक मुद्देराहूल पाटील, अमल महाडिक, राहुल आवाडे, नवीद मुश्रीफ यांनी नेले अर्ज गोकूळचे रणांगण : उमेदवारी अर्जातही नेत्यांच्याच वारसदारांची मनसबदारी

कोल्हापूर : गोकूळ निवडणुकीसाठी अर्ज नेण्याच्या पहिल्याच दिवशी तब्बल ७६ जणांनी २६० अर्ज नेले तर ७ जणांनी ते लगेच दाखलही केले. यात नेहमीप्रमाणे बडे नेते व त्यांच्या वारसदारांचा भरणा दिसत आहे. महादेवराव महाडीक यांचा मुलगा अमल , आमदार पी.एन. पाटील मुलगा राहूल , ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा मुलगा नविद, आमदार प्रकाश आवाडे यांचा मुुलगा राहूल यांचा अर्ज नेणाऱ्यांत प्रामुख्याने समावेश आहे.गोकूळ दूध संघाचे संचालकपद हे आमदारकीच्या तोलामोलाचे मानले जात असल्याने हे पद मिळावे यासाठी बरेच जण देव पाण्यात घालून बसतात. पण कांही घराण्यांच्या मक्तेदारीमुळे येथे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा शिरकाव करणे तसे महाकठीण असते. ही निवडणूक गटातंर्गत इर्ष्येंने आणि अंतर्गत खेळ्यांवर आधारीत लढवली जात असल्याने यात सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा टिका लागणेही तसे अशक्यच असते, त्यामुळे यंत्रणा हाताळण्यासाठी म्हणून बडे मातब्बर नेते व त्यांच्या वारसदारांचीच नावे पुढे केली जातात.

यातूनच गोकूळची फळे चाखणारी म्हणून स्वतंत्र घराणीच जिल्ह्यात तयार झालेली दिसतात. यावर्षीची निवडणुकही याला अपवाद नाही. सत्ताधारी व विरोधी आघाडीही तुल्यबळ असल्यामुळे यावेळची निवडणुक सोपी राहिलेली नसल्यामुळे प्रत्येक नेत्यांनी वारसदारांचे पत्ते बाहेर काढले आहेत.संचालक रामराजे कुपेकर यांच्यासह शिवसेनेचे माजी आमदार सुजित मिणचेकर, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनीही आम्ही तर मागे का राहू असे म्हणून उमेदवारी अर्ज नेले आहेत.शेवटी पालखीचे भोईचनेते व त्यांच्या वारसदारांचे अर्ज नेण्यासाठी मात्र निष्ठावंत कार्यकर्त्यांची फौज करवीर प्रांताधिकाऱ्यांच्या कार्यालयात सर्व सोपस्कार पूर्ण करण्यासाठी राबताना दिसत होती. नेते अर्ज भरत असताना कार्यकर्ते त्यांच्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात व्यस्त होते. त्यामुळे कार्यकर्ते किती निष्ठावंत असलेतरी ते पालखीचे भोईच असतात, हे यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

टॅग्स :Gokul MilkगोकुळElectionनिवडणूकkolhapurकोल्हापूर