दत्त-आसुर्लेसाठी सोमवारपासून अर्ज दाखल करण्यास सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:26 IST2021-09-18T04:26:51+5:302021-09-18T04:26:51+5:30

कोल्हापूर : आसुर्ले -पोर्ले (ता. पन्हाळा) येथील दत्त सहकारी साखर कारखान्यासाठी सोमवार (दि. २०) पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास ...

Applications for Dutt-Asurle will start from Monday | दत्त-आसुर्लेसाठी सोमवारपासून अर्ज दाखल करण्यास सुरू

दत्त-आसुर्लेसाठी सोमवारपासून अर्ज दाखल करण्यास सुरू

कोल्हापूर : आसुर्ले -पोर्ले (ता. पन्हाळा) येथील दत्त सहकारी साखर कारखान्यासाठी सोमवार (दि. २०) पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुुरुवात होत आहे. यापूर्वी २२ फेब्रुवारीला कारखान्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली होती; मात्र सर्वच निवडणुका स्थगित झाल्या होत्या. आता जिथे प्रक्रिया स्थगित केली होती, तेथून प्रक्रिया सुुरू होत आहे. हा कारखाना जिल्हा बँकेच्या थकबाकीपोटी दालमिया शुगर्सला विक्री केला आहे; मात्र संचालक मंडळाने कारखाना पुनरुज्जीवित केल्याने कारखान्याचे अस्तित्व कागदावरच आहे.

जिल्हा बँकेच्या १०६ कोटींच्या थकबाकीपोटी २०१२ मध्ये कारखान्याचा लिलाव करण्यात आला. दालमिया शुगर्सने १०८ कोटीला कारखाना विकत घेतला. महायुती सरकारच्या काळात तत्कालीन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी कारखाना अवसायनात काढण्याचा निर्णय रद्द केला. अवसायन प्रक्रिया रद्द केल्याने कारखाना पुनरुज्जीवित झाला. त्यामुळे निवडणूक घेण्याबाबत काही मंडळींनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानुसार ही प्रक्रिया सुरू आहे.

मंगळवार (दि. २१) पर्यंत अर्ज दाखल करण्यास मुदत असून, बुधवारी (दि. २२) छाननी होणार आहे. ८ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असून, गरज पडल्यास २३ ऑक्टोबरला मतदान घेतले जाणार आहे.

उत्पादक गटातील १५, महिला गटातील २, संस्था गट १ यासह राखीव गटातील ३ अशा २१ जागांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल होत आहेत. पन्हाळ्याचे प्रांताधिकारी भैरप्पा माळी हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.

अशा आहेत गटनिहाय जागा-

गट क्रमांक -१ करवीर (३)

गट क्रमांक -२ पोर्ले तर्फ ठाणे (३)

गट क्रमांक -३ यवलूज (३)

गट क्रमांक -४ कोतोली (३

गट क्रमांक - ५ बाजार भोगाव (२)

गट क्रमांक - ६ पन्हाळा, गगनबावडा (१)

संस्था गट -१

महिला प्रतिनिधी -२

अनूसूचित जाती/जमाती -१

इतर मागासवर्गीय -१

भटक्या विमुक्त जाती/ जमाती- १

Web Title: Applications for Dutt-Asurle will start from Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.