कामावर हजर व्हा, अन्यथा बडतर्फी

By Admin | Updated: November 24, 2015 00:36 IST2015-11-24T00:34:20+5:302015-11-24T00:36:39+5:30

महापालिका : गैरहजर ३१ कर्मचाऱ्यांना नोटीस

Appear on the job, otherwise it will be hard | कामावर हजर व्हा, अन्यथा बडतर्फी

कामावर हजर व्हा, अन्यथा बडतर्फी

कोल्हापूर : गेल्या काही महिन्यांपासून सतत विनापरवाना कामावर गैरहजर राहणाऱ्या ३१ कर्मचाऱ्यांना तत्काळ कामावर हजर राहा, अन्यथा बडतर्फ करण्यात येईल, अशा इशाऱ्याची नोटीस महानगरपालिका प्रशासनाने सोमवारी दिली.
नोटीस बजावलेले सर्व कर्मचारी हे मनपाच्या आरोग्य विभागातील आहेत. गेल्या काही महिन्यांपासून गैरहजर राहिल्यामुळे शहरातील दैनंदिन कचरा उठाव, रस्ते सफाई, गटार-चॅनेल सफाई, औषध फवारणी, सार्वजनिक शौचालयाची स्वच्छता आदी कामे पूर्ण क्षमतेने करणे अडचणीचे झाले आहे. म्हणूनच आयुक्त पी. शिवशंकर यांनी या सर्व कर्मचाऱ्यांना नोटिसा लागू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी या नोटिसा लागू केल्या आहेत.
नोटीस लागू केलेल्यांमध्ये चंद्रगुप्त घावरे, कुमार मोहिते, रंजिता हटवाल, श्रद्धा हटवाल, महेश हटवाल, तुकाराम खेचरे, दीपक चंडाल, नंदू घावरे, मधुकर मोरे, गंगा कराडे, मारुती कांबळे, सतीश नाईक, सुरेश लोखंडे, उमेश चंडाले, दीपक हत्तीकर, मालन घुले, सागर पटवणे, रवींद्र साठे, संगीता साठे, विकास कांबळे, शरिफ शेख, विजय कांबळे, अशोक लोंढे, प्रमोद लिंगाडे, अरुण भालेकर, सचिन छपरीबंद, संजय पाटील, सुनील छपरीबंद, सुनील चौधरी, उदय कांबळे, चंद्रकांत चव्हाण, आदींचा समावेश आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Appear on the job, otherwise it will be hard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.