शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षण याचिकेत त्रयस्थ पक्षकार म्हणून अर्ज : दिलीप पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 16:14 IST

मराठा आरक्षणाविरोधात अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आरक्षणाला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

ठळक मुद्देमराठा आरक्षण याचिकेत त्रयस्थ पक्षकार म्हणून अर्ज : दिलीप पाटील मूठभर लोकांचे आरक्षण रोखण्याचे षडयंत्र

कोल्हापूर : मराठा आरक्षणाविरोधात अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आरक्षणाला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

या याचिकेत कोल्हापूर सकल मराठा समाजातर्फे त्रयस्थ पक्षकार (इंटरवेन) म्हणून अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आमचीही बाजू न्यायालय ऐकून घेईल, अशी माहिती समन्वयक दिलीप पाटील यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. मराठा द्वेषाने पछाडलेल्या मूठभर लोकांचे हे आरक्षण रोखण्याचे षडयंत्र असल्याची टीकाही त्यांनी केली.दिलीप पाटील म्हणाले, मराठा आरक्षणाविरोधात अ‍ॅड. सदावर्ते यांनी दाखल केलेली याचिका ही पूर्णपणे चुकीची आहे. त्यात कोणतेही तथ्य नाही. आम्ही त्यांचे आरक्षण मागत नाही किंवा कोणाचाही हिस्सा मागत नाही. हा फक्त मराठा द्वेषाने पछाडलेल्या लोकांनी पुढे केलेला चेहरा आहे.

सदावर्ते यांच्या मागे असलेल्या लोकांना लवकरच धडा शिकविला जाईल. मूठभर लोकांनी केलेले हे षडयंत्र त्वरीत थांबवावे. नाही तर मराठा समाजातील धग बाहेर पडून सामाजिक व्यवस्थेला हानी पोहोचू शकते.

सरकारनेही ही बाब लक्षात घ्यावी. कारण मराठा समाजाने आरक्षण मिळविण्यासाठी मोठा संघर्ष केला आहे. या याचिकेच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाचेही म्हणणे ऐकून घ्यावे यासाठी त्रयस्थ पक्षकार म्हणून अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे सुनावणीवेळी न्यायालय आमची बाजू ऐकून घेईल.प्रा. जयंत पाटील म्हणाले, मराठा आरक्षणाविरोधात कितीही याचिका दाखल झाल्या तरी त्याला विरोध करण्यासाठी त्याच भाषेत कायदेशीर आव्हान दिले जाईल. याबाबत राज्य शासनही सतर्क असले तरी त्यांनी अखेरपर्यंत समाजाच्या पाठीशी ठामपणे रहावे. यावेळी राजीव लिंग्रस, सचिन तोडकर, उमेश पोवार, स्वप्निल पार्टे, विजय जाधव आदी उपस्थित होते.

हाळवणकरांचे वक्तव्य ‘दादां’च्या अडचणीसाठीमराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर कोल्हापूरात भाजपसह कोल्हापूरवासीयांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे उत्साहात स्वागत केले होते. यावेळी भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी आरक्षणाचा निर्णय दृष्टीक्षेपात असतानाच आंदोलन करणारे हे खंडोजी खोपडेचे वंशज असल्याची टीका केली होती. यावर प्रा. जयंत पाटील यांनी लोकशाही मार्गाने सुरु असलेल्या आंदोलनावर अशा प्रकारे वक्तव्य करुन आमदार हाळवणकरांना ‘दादां’ना अडचणीत आणायचे नाही ना? अशी शंका येत असल्याचा टोला लगावला. 

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणkolhapurकोल्हापूर