पुरस्करासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:29 IST2021-09-12T04:29:16+5:302021-09-12T04:29:16+5:30

थेरगाव (ता शाहूवाडी) येथील राजर्षी शाहू सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने राजर्षी शाहू साहित्य गौरव पुरस्कार तसेच ग्रंथमित्र पुरस्कार देण्यात येणार ...

Appeal to send material for the award | पुरस्करासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन

पुरस्करासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन

थेरगाव (ता शाहूवाडी) येथील राजर्षी शाहू सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने राजर्षी शाहू साहित्य गौरव पुरस्कार तसेच ग्रंथमित्र पुरस्कार देण्यात येणार आहेत. २०२० ते २०२१ या वर्षामध्ये प्रसिद्ध झालेल्या कवितासंग्रह, कथासंग्रह, कादंबरी, प्रवासवर्णन, आत्मकथन, चरित्र, वैचारिक आदी साहित्य विभाग प्रकारातील प्रत्येकी एका सर्वोत्तम साहित्य कालाकृतीस राजर्षी शाहू साहित्य गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी स्वतःच्या प्रकाशित साहित्यकृतीच्या दोन प्रती राजर्षी शाहू सार्वजनिक वाचनालय थेरगांव, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर या पत्त्यावर १५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत पाठवाव्यात असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष चंद्रकांत रेडेकर ,प्रा. प्रकाश नाईक, उपाध्यक्ष तानाजी चौगुले आणि सचिव शरद रेडेकर यांनी केले आहे.

Web Title: Appeal to send material for the award