आप्पासाहेब शिंदे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:17 IST2021-07-15T04:17:47+5:302021-07-15T04:17:47+5:30

कोल्हापूर : जवाहरनगरातील आप्पासाहेब शिंदे (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ...

Appasaheb Shinde passed away | आप्पासाहेब शिंदे यांचे निधन

आप्पासाहेब शिंदे यांचे निधन

कोल्हापूर : जवाहरनगरातील आप्पासाहेब शिंदे (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते संगीतसूर्य केशवराव भोसले यांचे ते नातू होत. शाहूसेनेच्या माध्यमातून त्यांनी राजर्षी शाहू महाराजांचे विचार जोपासले होते. अलीकडेच शाहू चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन करून वृद्धापकाळातही सामाजिक कार्य सुरूच ठेवले होते.

धोंडीराम पाटील

कोल्हापूर : भाटणवाडी (ता. करवीर) येथील धोंडीराम अंतू पाटील (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते जिल्हा पोलीस दलातील सहायक फौजदार प्रकाश पाटील व हवालदार राजाराम पाटील यांचे वडील होत.

रशीद अहमद काझी

कोल्हापूर : साने गुरुजी वसाहतीतील रशीद अहमद हुसेनसाब काझी (वय ६४) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, असा परिवार आहे. ते बँक ऑफ महाराष्ट्रमधून कॅशियर पदावरून निवृत्त झाले होते.

संतोष बिल्ले

कोल्हापूर : संभाजीनगर,गणेश काॅलनीतील संतोष एकनाथ बिल्ले (वय ३९) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, भावजय, बहीण असा परिवार आहे.

कुमार पाटील (किणीकर)

कोल्हापूर : ताराबाई पार्कातील कुमार आदगौंडा पाटील (किणीकर) वय ८७ यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चातमुलगा, दोन मुली, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे. ते मार्केट यार्डातील नॅशनल केमिकल्सचे मालक होत. तर कोल्हापूर चेंबर ऑफ काॅमर्सचे उपाध्यक्ष संजय पाटील यांचे वडील होत.

सचिन खोतलांडे

कोल्हापूर : शाहूपुरी व्यापारीपेठेतील सचिन दत्तात्रय खोतलांडे (वय ४४) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, गुरुवारी आहे.

संभाजी सरनाईक

कोल्हापूर : शिवाजी पेठ,खंडोबा देवालय समोरील संभाजी सदाशिव सरनाईक (वय ७७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

उषा पसारे

कोल्हापूर : राजारामपुरी नववी गल्लीतील उषा रामचंद्र पसारे (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Web Title: Appasaheb Shinde passed away