शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

राजकारणात काहीही घडू शकते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2018 11:56 PM

मुरगूड : कागल तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वच नेत्यांनी गटातटाच्या पुढे जावे, असे सांगून तसेच संजयबाबा घाटगे यांनी बॉलिंग करावी आणि आपण फक्त बॅटिंग करावी किंवा आपण बॉलिंग करावी आणि बाबांनी बॅटिंग करावी हे मान्य नसून कागलच्या राजकारणात आम्ही दोघांनीही कायमच बॅटिंग करावी, अशी माझी इच्छा असून भविष्याच्या राजकारणात काय होणार ...

मुरगूड : कागल तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वच नेत्यांनी गटातटाच्या पुढे जावे, असे सांगून तसेच संजयबाबा घाटगे यांनी बॉलिंग करावी आणि आपण फक्त बॅटिंग करावी किंवा आपण बॉलिंग करावी आणि बाबांनी बॅटिंग करावी हे मान्य नसून कागलच्या राजकारणात आम्ही दोघांनीही कायमच बॅटिंग करावी, अशी माझी इच्छा असून भविष्याच्या राजकारणात काय होणार हे आपल्याला माहीत नाही असे सांगतानाच राजकारणात काहीही होऊ शकते, असे सूचक वक्तव्य शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक यांनी केले.निमित्त होते नगराध्यक्ष चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामान्यांच्या उद्घाटन. यावेळी संजय मंडलिक व माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्या हस्ते या सामन्याची नाणेफेक झाली. खेळाडूंची ओळख झाल्यानंतर संयोजकांच्या वतीने निवेदकांनी संजय मंडलिक यांनी बॅटिंग करावी व संजयबाबा यांनी बॉलिंग करावी, असे आवाहन केले. पण दोघाही नेत्यांनी बॅटिंग करून चांगलीच फटकेबाजी केली.यावेळी संजय मंडलिक पुढे म्हणाले, कागल तालुक्याच्या पर्यायाने मुरगूडच्या क्रीडा विकासासाठी आपण भरीव प्रयत्न करणार असून, मुरगूड शहरामध्ये होणाऱ्या सर्वच स्पर्धा वेगळ्या आणि भव्यदिव्य होतात. सध्याचे मैदान यासाठी अपुरे ठरत आहे. नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक यांनी सामूहिक प्रयत्न करून भव्य मैदान तयार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत यासाठी आपले सहकार्य मिळेल, असे आश्वासन त्यांनी दिले. या मैदानाला अडथळा येईल, असे कोणतेही काम पालिका करणार नाही, असे अभिवचन त्यांनी दिले.स्वागत सम्राट मसवेकर यांनी केले. प्रास्ताविकातून जिल्ह्याच्या विकासासाठी संजय मंडलिकच खासदार झाले पाहिजे, असे नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी सांगितले. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर, सहायक पोलीस निरीक्षक राकेश हांडे, दलितमित्र डी. डी. चौगले, माजी नगराध्यक्ष सुखदेव येरुडकर, सुहास खराडे, दगडू शेणवी, शिवाजी इंदलकर, दत्ता मंडलिक, बी. एम. पाटील, नंदू पाटील, शेखर सावंत, जयसिंगराव भोसले, संदीप कलकुटकी, म्हाळू बोते उपस्थित होते. आभार समाधान्राजेखान, दोन खडे जवळ ठेवाप्रा. मंडलिक यांनी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांना मनोहर जोशी यांचे उदाहरण देत जर यशस्वी व्हायचे असेल, तर जमादार तुम्ही दोन खडे जवळ ठेवा. त्यातील बर्फाचा खडा डोक्यावर ठेवा आणि दुसरा साखरेचा खडा तोंडात ठेवा, असे सुचवले. तसे झाल्यास तुमच्याजवळ आहे त्यापेक्षा लोक अधिक येतील.