अणुस्कुरा ग्रामपंचायत बिनविरोध. जनसुराज्य गट तटस्थ, सातही सदस्य शिवसेना गटाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:03 IST2021-01-13T05:03:52+5:302021-01-13T05:03:52+5:30

कासारी खोऱ्यातील घाटमाथ्यावरील गाव म्हणून अणुस्कुरा ओळखले जाते. चौकेवाडी, न्हाव्याचीवाडी, मुसलमानवाडी, लाडवाडी, चौगुलेवाडी, गावठाण या ...

Anuskura Gram Panchayat unopposed. Jansurajya group neutral, all seven members of Shiv Sena group | अणुस्कुरा ग्रामपंचायत बिनविरोध. जनसुराज्य गट तटस्थ, सातही सदस्य शिवसेना गटाचे

अणुस्कुरा ग्रामपंचायत बिनविरोध. जनसुराज्य गट तटस्थ, सातही सदस्य शिवसेना गटाचे

कासारी खोऱ्यातील घाटमाथ्यावरील गाव म्हणून अणुस्कुरा ओळखले जाते. चौकेवाडी, न्हाव्याचीवाडी, मुसलमानवाडी, लाडवाडी, चौगुलेवाडी, गावठाण या वाड्यांचा अणुस्कुरा ग्रामपंचायतीमध्ये समावेश होतो. ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाल्यानंतर बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. त्याअनुषंगाने स्थानिक नेत्यांनी प्रयत्न सुरू केले होते. समझोत्यासाठी बैठकाही झाल्या. परंतु जागावाटपावरून चर्चा निष्पळ झाली. माजी आमदार सत्यजित पाटील गटाचे स्थानिक नेते, चिमाजी पाटील, दीपक पाटील, विकास सेवा सोसायटी चेअरमन डॉ उदय म्हेत्तर, कासम साठवीलकर, नितीन पांचाळ, चंद्रकांत पाटील, दीपक जांभळे यांनी ग्रा.पं. बिनविरोध करण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. विरोधी गटाकडून एकही अर्ज विरोधात भरण्यात आला नाही.

दरम्यान, बैठकीत झालेल्या चर्चेप्रमाणे विद्यमान सत्ताधारी गटातील पुढाऱ्यांनी शब्द पाळला नाही. गावाच्या विकासाच्यादृष्टीने उमेदवारी अर्ज भरले नसल्याचे विरोधी गटाकडून सांगण्यात आले. बिनविरोध उमेदवार पुढीलप्रमाणे : प्रभाग क्रमांक एक - हुसेन साठवीलकर, सुगंधा मंगेश पाटील, दीप्ती दीपक पाटील. भाग क्रमांक दोन - सचिन विश्वनाथ लाड, नंदिनी अनंत पाटील. प्रभाग क्रमांक तीन- प्रभावती प्रभाकर सुतार, चंद्रकांत विठोबा जांभळे.

Web Title: Anuskura Gram Panchayat unopposed. Jansurajya group neutral, all seven members of Shiv Sena group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.