बांबवडे येथे १७७ जणांची अँटिजन तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:19 IST2021-06-25T04:19:01+5:302021-06-25T04:19:01+5:30

बांबवडे : बांबवडे (ता. शाहूवाडी) येथे दोन अँटिजन स्वॅब तपासणी केंद्राद्वारे १७७ लोकांच्या टेस्ट करण्यात ...

Antigen test of 177 people at Bombay | बांबवडे येथे १७७ जणांची अँटिजन तपासणी

बांबवडे येथे १७७ जणांची अँटिजन तपासणी

बांबवडे : बांबवडे (ता. शाहूवाडी) येथे दोन अँटिजन स्वॅब तपासणी केंद्राद्वारे १७७ लोकांच्या टेस्ट करण्यात आल्या . त्यामध्ये तेरा लोक कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचे समोर आले. यामध्ये बांबवडेतील स्थानिक तीन तर बाहेरगावच्या दहा नागरिकांचा समावेश आहे.

आज बांबवडे येथील बाजारपेठ व धनगर गल्ली या दोन ठिकाणी लोकांचे स्वॅब घेण्यात आले. त्यात एकूण तेरा लोकांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळले. तपासणी केंद्रामध्ये डाॅ. आर. एम. रणदिवे, डाॅ. नीलम काटकर, लॅब टेक्निशियन अरुण मगदूम, शिरला पाटील, आरोग्यसेवक बी.ए. जाधव, आर.जी. सूर्यवंशी, ए. डी. पाटील, ए.पी. दुर्गे, उपसरपंच सयाजी निकम, ग्रामसेवक गुरुप्रसाद कमलाकर दीपक पाटील, प्रकाश निकम, यांच्यासह ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

.

Web Title: Antigen test of 177 people at Bombay