शित्तूर-वारूण येथे १२३ जणांची अँटिजन टेस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:16 IST2021-06-23T04:16:55+5:302021-06-23T04:16:55+5:30
शित्तूर-वारूण येथील आरोग्य प्रशासन, कोरोना दक्षता व सनियंत्रण समितीमार्फत कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व निर्जंतुकीकरण औषध फवारणी करण्यात येत आहे. तरीदेखील ...

शित्तूर-वारूण येथे १२३ जणांची अँटिजन टेस्ट
शित्तूर-वारूण येथील आरोग्य प्रशासन, कोरोना दक्षता व सनियंत्रण समितीमार्फत कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व निर्जंतुकीकरण औषध फवारणी करण्यात येत आहे. तरीदेखील कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता नागरिकांनी शासनाने घालून दिलेले नियम पाळणे गरजेचे बनले आहे. अन्यथा हा धोका आणखीन वाढण्याची शक्यता अधिक आहे.
या तपासणीवेळी आरोग्य प्रशासनातील कर्मचारी, परिसरातील सर्व ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक, सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, महसूल व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.