कबनूरमध्ये १०० लोकांची अ‍ॅँटिजन तपासणी दोन पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:23 IST2021-05-22T04:23:23+5:302021-05-22T04:23:23+5:30

कोरोना रुग्णांची वाढती संख्या नियंत्रणात आणण्यासाठी नागरिकांशी थेट संपर्क येणारे व सुपर स्प्रेडर ठरू शकतील, अशांचा शोध घेण्यासाठी प्राथमिक ...

Antigen test of 100 people in Kabnur, two positive | कबनूरमध्ये १०० लोकांची अ‍ॅँटिजन तपासणी दोन पॉझिटिव्ह

कबनूरमध्ये १०० लोकांची अ‍ॅँटिजन तपासणी दोन पॉझिटिव्ह

कोरोना रुग्णांची वाढती संख्या नियंत्रणात आणण्यासाठी नागरिकांशी थेट संपर्क येणारे व सुपर स्प्रेडर ठरू शकतील, अशांचा शोध घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करण्यात आली. रेशन दुकान, मेडिकल, दूध केंद्र, किराणा दुकान, बेकरी, भाजीपाला विक्रेते, फळविक्रेते व व्यावसायिकांची तपासणी केली जाणार आहे. अ‍ँटिजन तपासणी केलेल्या व्यावसायिकांनाच आपले व्यवसाय सुरू करण्यास परवानगी राहणार आहे.

अंगणवाडीसेविका, मदतनीस व आशा वर्कर्स यांनी व्यावसायिकांचा सर्व्हे केला आहे. पहिल्या दिवशी १०० व्यक्तींची तपासणी करण्यात आली. तपासणीत २ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या. त्यांना तात्काळ पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. यावेळी तलाठी एस.डी. पाटील, ग्रामसेवक बी.टी. कुंभार, सरपंच शोभा पोवार, ग्रा.पं. सदस्य सैफ मुजावर, शिवाजी चव्हाण, जावेद फकीर, आरोग्यसेविका व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Antigen test of 100 people in Kabnur, two positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.