‘सॅप’तर्फे उद्यापासून अँटी रेबिज लसीकरण

By Admin | Updated: November 21, 2014 00:34 IST2014-11-20T23:56:10+5:302014-11-21T00:34:31+5:30

शनिवारी (दि. २२) आणि २८ व २९ नोव्हेंबरला हे शिबिर सकाळी दहा ते दुपारी एक आणि सायंकाळी पाच ते सात या वेळेत राजारामपुरी पाचव्या गल्लीतील ‘सॅप’ पेट्स क्लिनिकमध्ये

Anti-Rabies Vaccination By 'SAP' | ‘सॅप’तर्फे उद्यापासून अँटी रेबिज लसीकरण

‘सॅप’तर्फे उद्यापासून अँटी रेबिज लसीकरण

कोल्हापूर : येथील सोसायटी फॉर अ‍ॅनिमल प्रोटेक्शनतर्फे (सॅप) पाळीव प्राण्यांसाठी अँटी रेबिज लसीकरण व जंत निर्मूलन शिबिर आयोजित केले आहे. शनिवारी (दि. २२) आणि २८ व २९ नोव्हेंबरला हे शिबिर सकाळी दहा ते दुपारी एक आणि सायंकाळी पाच ते सात या वेळेत राजारामपुरी पाचव्या गल्लीतील ‘सॅप’ पेट्स क्लिनिकमध्ये होणार आहे.
पाळीव प्राण्यांच्या संपर्कातून काही झुनॉटिक आजार माणूस व प्राण्यांमध्ये एकमेकांमुळे संक्रमित होतात. त्यापैकी रेबिज हा एक भयानक आजार आहे. ज्यावर अद्यापही खात्रीशीर इलाज होऊ शकत नाही. त्यासाठी पाळीव प्राण्यांना पचनशक्तीस बाधा होऊ नये, तसेच ती सुधारण्यासाठी आणि तंदुरुस्तीसाठी त्यांना जंतनाशक औषध देणे आवश्यक असते. ते लक्षात घेऊन ‘सॅप’ने हे शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरात आपल्या पाळीव प्राण्यांना सहभागी करण्यासाठी ‘सॅप’ पेट्स क्लिनिक मध्ये नागरिकांनी संबंधित प्राण्यांची नावनोंदणी करावी, असे आवाहन ‘सॅप’चे सहसचिव अभिजित पाटील यांनी पत्रकाद्वारे केले. (प्रतिनिधी)

Web Title: Anti-Rabies Vaccination By 'SAP'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.